पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९९ वैशिष्ट्यावगमन झालेले दिसत नाहीं. कमी मह- त्त्वाचे जे साधु आहेत त्यांच्याविषयीं कांहींहि लिहिलेलें चालतें. या सन्मणिमालेतील वर्णना- वरून दुसऱ्या एका गोष्टीची आठवण होते. एकदां एका कॉलेजांतील मंडळी प्रोफेसरला मानपत्र देत होती, त्यांत प्रोफेसरचे सर्व गुण मोठ्या अतिशयोक्तीच्या स्वरूपांत वर्णिले होते. तेव्हां कांहीं मानपत्र देणारी मंडळी म्हणाली की, या मानपत्राच्या प्रती त्यांवर प्रोफेसरचें नांव न घालतां छापून काढाव्यात आणि जो प्रोफेसर जाईल त्याचें नांव त्यांत घालावें म्हणजे प्रत्येक वेळेस छपाईचा खर्च वांचेल. एखादें ठराविक वर्णन वाटेल त्या योद्ध्याच्या किंवा कवीच्या संबं- धाने दडपून द्यावें ही वृत्ति फारच बोकाळली आहे. बरीचशीं संतवर्णनें एका ठराविक सांच्याचीं बनविलीं असतात आणि तीं त्या संतकवींच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत असतात. दुसन्या एखाद्या कवीच्या ग्रंथाल| प्रस्तावना लिहितांना तेंच वर्णन कायम ठेवून संतकवीचें नांव बदललें म्हणजे झाले. या तऱ्हेची संतकवींची लागेल त्या गौरव- युक्त शब्दांनीं युक्त वर्णर्ने दडपून देण्याचा प्रघात फार पडला आहे. या " दडपिश्वमे " संप्रदायांच्या मंडळींना आपल्या अभिप्रायसंप्र- दायाची पूर्वपीठिका मोरोपंतांपर्यंत भिडविण्यास कोणतीच अडचण नाहीं. सन्मणिमार्लेतील मोरोपंतांचे मुक्तेश्वर कवीसंबंधाने मत देऊन मुक्तेश्वरास मोरोपंत कवींत श्रेष्ठ समजत होता असे दाखविण्याचा प्रयत्न दोन लेखकांनी केला आहे. मला तर त्यावरून कांहीं एक सिद्ध होईल असे वाटत नाहीं सन्मणिमालेत कोठेच मार्मिकता दिसून येत नाहीं आणि मुक्तेश्वरावर मोरोपं- ताची भक्तीहि दिसत नाहीं. मुक्तेश्वरावर मोरो- पंतांनी लिहिलेली आर्या येणेंप्रमाणे आहे- “श्रीमुक्तेश्वर कविवर यातें कोण न शुभेच्छु बंदील बंदी लक्ष जयाचे, त्याचें यश भव्य जैवि मंदील " या महपति आणि मोरोपंत आयेंतील " कविवर " शब्दास महत्त्व देण्यांत कांहीं एक अर्थ नाहीं. यांत एवढेंच सम- जावयाचें कीं मुक्तेश्वरास संत म्हणण्याऐवजी कवि म्हणण्याकडे मोरोपंताच्या मनाची प्रवृत्ति होती. मुक्तेश्वरास खुद्द मोरोपंत कविवर म्हणतो यावरून तो त्याचें कत्रींत उच्चत्व मान्य करतो आणि आपल्यापेक्षां त्यांची कविता उच्च आहे असा कबुलीजबाब देतो असें म्हणण्यांत कांहीं तात्पर्य नाहीं. व त्यावरून मुक्तेश्वराची मोरो- पंतापेक्षां उच्चता ठरविणें म्हणजे लेखक वर्गी- तील स्वाभाविक परंपरा लक्षांत न घेणें आहे. जुन्या सर्व लोकांस उत्तरकालीनांनी मान देणे अवश्य असतें. कारण त्यांतच सौजन्य असतें किंबहुना उत्तरकालीनानें तसें केलें नाहीं तर त्याची निंदाच होईल. मुक्तेश्वरावरील वर दिलेल्या अभिप्रायांत ज्याचे लाखों लोक प्रशंसा करणारे भाट आहेत असें विधान देखील वस्तुस्थिति दर्श- विणारे किंवा मोरोपंताचा अभिप्राय दर्शविणारें आहे असे म्हणतां येत नाहीं. "बंदी लक्ष" हे शब्द वंदील आणि मंदील यांशी अनुप्रास साध- ण्यासाठी आले आहेत, आणि त्यामुळे त्यांस महत्त्व देतां येत नाहीं. सन्मणिमालेत ज्या आर्या केवळ संतकवींच्या चमत्कारासंबंधाने किंवा त्यांच्या लोकांनां तार- ण्याच्या शक्तीसंबंधानें नसून कवित्वावर किंवा ग्रंथावर आपला सन्मानयुक्त अभिप्राय वर्णन करणान्या आहेत किंवा निदान ग्रंथांचा उल्लेख करणाऱ्या किंवा विशिष्ट व्यक्तींचा कवी शब्दानें वर्णन करणाऱ्या आहेत त्या येणेंप्रमाणें. (१) " नमिला साष्टांग श्रीपति- भक्तिरसज्ञ वामनस्वामी । रसभवना तत्कवना मानी या तेंवि वामन स्वामी" ॥१७॥ (२)" मान्य पुरंदर विट्ठल सुकविकुळीं पदपराज नाक वनीं ।