पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपदक्षिण सन्मणिमार्लेतील पहिल्या चार आर्या निवृत्ति, ज्ञानदेव इत्यादि चार भावंडांवर आहेत त्या आर्या तच सन्माणिमालेचें पूर्ण स्वरूप व्यक्त होतें व्या येणेंप्रमाणे- “सद्योगगुणमणींची ज्याच्या हृदयीं सदा सुखनिने वृत्ति । तो मज दीना दासा देऊ दावुनि पदा सुख निवृत्ति ॥१॥ जो ज्ञानराज भगवान् श्रवणीं सुज्ञान दे वंदे वाचा !! अवतार गमे अकरावा का सुज्ञान देवदेवाचा ॥२॥ नमन असो त्या ज्याचीं वचनें वैकुंठसदनसोपानें । सोपानें यश केलें कीं 1 ज्याच्या मोहगद न सोपानें ॥ ३ ॥ जरि शुचि - मूर्ति सुवृत्ता मान्या श्रवणोचितें गुर्णे मुक्ता । विद्धा जडाहिँ ते; हे अगुणाही तीस करि उणें मुक्ता॥" या चार आर्यामध्ये कोणावर हि मोठे मार्मिक विधान मयूरांनी केलें नाहीं. निवृत्तिनाथाला लाव- लेलें विशेषण म्हटलें म्हणजे ज्याच्या हृदयांत नेहेमीं चांगल्या योगगुणांची खनि आहे, हे होय. खानि म्हणण्याचें कारण त्या शब्दाशेजारीं वृत्ति शब्द वापरून निवृत्तीशीं यमक साधले पाहिजे एवढेंच होतें. ज्ञानेश्वराला अकरावा अवतार म्हणावें, आणि तो सुज्ञान देतो म्हणून सांगावें यांत मोठी मार्मि- कता व्यक्त होत नाहीं. सोपान देवाविषयीं लिहि- तांना त्याच्या नांवाला अर्थ उत्पन्न करण्यासाठीं त्याच्या वचनांला बैकुंठसदनसोपान म्हटले आहे. हें विशेषण निवृत्तीच्या वचनाला लावलें तर काय बिघडलें असतें ? शब्दालंकार होत नाहीं एवढेंच. नांवावर शब्दालंकार करणें म्हणजे व्यक्तीविषयीं मार्मिक मत देणें मुळींच नाहीं. शिवाय सोपानविषयक सर्व विधान यमकावलंबी झाले आहे ज्याच्या पानें मोहगद उत्पन्न होत नाहीं असें म्हणण्यांत मोहगद हा शब्द "पान" या शब्दामुळे आलेला आहे आणि पान शब्द सोपान याशी यमक जुळविण्यासाठी आला आहे. आणि सोपानदेवाला एकंदरीत सर्टिफिकोट काय मिळाले की ( १ ) ज्याचीं वचनें वाचलीं तर ९८ मनुष्यास मोहगद उत्पन्न होणार नाहीं ! मुक्ताबाई- वर मोरोपंत काय लिहिणार हें मुक्ताबाईच्या कार्यवौशिष्ट्यावरून न ठरतां "मुक्ता" नांवावरू. नच ठरलें आहे आणि त्यामुळे सुवृत्ता, विद्धा, अगुणा, श्रवणोचित इत्यादि शब्द आले आहेत. ज्ञानेश्वर चतुष्टयासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींचा निकाल या तन्हेनें लावला आहे तर इतर कवीं- वर अभिप्राय मोठे मार्मिकतेचे नसणार हि उघड आहे. आश्चर्याची गोष्ट एवढीच की संत- कवींचें महत्त्व सांगतांना एवढेच नव्हे तर त्यांच्या काव्यासंबंधानं लिहितांना मोरोपंतांचा अभिप्राय मांडला जातो हा होय. यमकसाधू मोरोपंताच्या अभिप्रायास महत्त्व देण्याची चुकी फार लोकां- कडून झाली आहे. सन्मणिमालेत नामदेवाचा उल्लेख विसोबा खेचर याच्या अनुषंगाने आलेला आहे. एकना थाच्या काव्यावर मत कांहीं नाहीं. त्याच्या शांती- वर मत आले आहे. रामदासाचें वर्णन करतांना "रामदासाची" याशी यमक करण्यासाठी कामदा- साची" हे शब्द आले. कामदा शब्द आल्यामुळे कामदा हैं स्त्रीलिंगी शब्दाचे विशेषण करावें लागलें तो स्त्रीलिंगी शब्द कीर्ति हा निवडला गेला; आणि रामदासाची कीर्ति “कामदा " कशी तर कल्पतरु, कामधेनु, सुरनदी यांहिपेक्षां अधिक असें वर्णन बनले. या प्रसंगी कीर्तीच्या ऐवजी कृपा, दया हे शब्द अधिक शोभले नसते काय ? पण हे शब्द मोरोपंतांनां सुचले नसणे शक्य नाहीं. वृत्तासाठी कल्पना बाजूस टाकली असावी म्हणजे सत्कीर्ति हे शब्द वापरण्यांत हेतु एवढाच कीं शब्द वृत्तांत बसविण्याइतक्या मात्रांचा असला पाहिजे आणि सत्कीर्ति हा शब्द अवश्यमात्रांचा आहे. एवंच सन्मणिमार्लेत कोणत्याहि कवीवर मोठें मार्मिक मत नहीं किंवा संत या दृष्टीने देखील