पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहेच. निळोबांनी तुकारामाची एक आरती देखील लिहिली आहे. (निळोबागाथा पृ. ३३५). दासोपंत दासोपंतचरित्र (ग्रंथकार अनिश्चितः प्र. महा राष्ट्र कवि पु. २) हें चरित्र श्रीधर नाझरेकर कवीचें आहे असें म्हणणं चूक आहे असे प्रका- शक सांगतात. निरंजन माधव . याच्या सांप्रदाय परिमळांत याचें आत्मचरित्र आहे. जुन्या कवींचे भोक्ते पुष्कळ ठिकाणी आहेत आणि जरी अर्वाचीन कवींनीं आपल्या अस्ति- त्वाचें समर्थन केलें आहे तरी जुन्या कवींचा भोक्ता वर्ग वाढतच आहे. मी महाराष्ट्रभर प्रवास करीत असतां मला जुन्या कवींचे ग्रंथ एकत्र जमून वाचणारी अशी मंडळी पुष्कळच भेटली आणि ती निरनिराळ्या वर्गात आहेत. पोस्ट - नपासून डेप्युटी कलेक्टरांपर्यंत या प्रकारची मंडळी सांपडतात. व ती वाचनासाठी एकत्र जम तात हे पाहून माठे समाधान वाटलें. कांहीं मंडळी कवींचें एकांतांत वाचन करतांना दिसतात, कांहीं मंडळी संध्याकाळीं संतकवींचे ग्रंथ वाचण्यासाठी एकत्र जमतात. अशा तन्हेनें जागोजाग नांव न दिलेली अभ्यासक मंडळे आहेत. त्यांनां माझी ही सूचना आहे कीं, एक कवि दुसऱ्या कवीचा उल्लेख करतो. असे उल्लेख दिसल्याबरोबर काढणें आणि एकाच व्यक्तीविषयीं निरनिराळ्यांतीं काय लिहिले असेल तें ताडून पहाणे यासारख्या क्रिया अवश्य कराव्यात. तसलीं टाचणें प्रसिद्ध केल्यास तीं वाङ्मयाच्या ऐतिहासिक अभ्यासकास उपयोगी पडतील. प्रकरण १५ वै. महिपति आणि मोरोपंत मोरोपंत व महिपति या दोघांनां निराळे काढ- ण्याचे कारण एवढेच की एक चरित्रकार या नांवानें १३ ९७ महिपति आणि मोरोपंत प्रख्यात आहे तर दुसरा रसिक लेखक या दृष्टीनें प्रख्यात आहे; सन्माणिमालेत संतकवींवर अनेक शेरे असल्यामुळे प्रत्येकाच्या कवितेवर कांहीं तरी अभिप्राय मोरोपंतांनी व्यक्त केला असेल अशी तें काव्य न वाचणाराची समजूत असते; तर महि- पति व मोरोपंत या दोघांनीं आपल्या प्रशस्त्यांत काव्यगुणाभिज्ञता कितपत दाखविली आहे याचा सविस्तर विचार प्रस्तुतसारख्या पुस्तकांत वाचक अपेक्षितात. मोरोपंतांनी संतकवींसंबंधाने केवळ सन्माण- माला लिहिली अस नाही तर ज्ञानदेव, चांगदेव, नामदेव, कबीर, नरसिंह मेहता, एकनाथ, श्रीनाथ, रामदास, बामनपंडित, तुकाराम, तुळसीदास, माधव- दास, महिपति इत्यादींवर स्वतंत्र काव्ये लिहिलीं आहेत. सन्मणिमालेत मोरोपंतांनी फार मोठ्या संतसमूहावर केवळ पुष्पवृष्टि केली आहे. “पुष्प वृष्टि" म्हणण्याचें कारण हैं कीं त्यांत गुण-दोष- " विषयक परीक्षण करण्याच्या हेतु नसून गौरव कर- ण्याचा हेतु होता. कबीच्या मनांत फक्त गुणवर्णन कण्याचे कारण नाहीं. परीक्षक वृत्तीचा मनुष्य करावयाचें होतें एवढ्यामुळेच आपणांस बिच- स्तुति करता करतांच व्यक्तीस भिन्न तन्हेची स्तुति देऊन त्यांच्यावर अभिप्राय व्यक्त करूं शकतो. तसें मोरोपंतांनी केलें होतें काय हे आपणांस पाहिले पाहिजे. आणि यासाठीं सन्माणिमालेचे अधिक बारीक अवलोकन करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाची स्तुति करूनहि मार्मिकता दाख- त्रिण्याचा प्रयत्न करणें हें मोरोपंतांना शक्य होतें. पण मोरोपंतांची इच्छा परीक्षणदृष्टीची नव्हती. तर केवळ काव्य करण्याची इच्छा होतो. त्यांचे निर निराळ्या व्यक्तीवर लिहिणे कोठें शब्दावर श्लेष करण्याच्या इच्छेनें तर कोठें प्रास साधण्याच्या इच्छेनें नियमित झालें आहे. 16 MAR 1990