पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रांचे काव्यपरीक्षण घातले आहे (काव्यसंग्रह ग्रं. ३७, पृ. ५). हें खंडे - रायांनीं उद्धवचिद्धनापासून उसने घेतलें असावें असा तर्क होतो. एकनाथावर निळोबांनी आरती लिहिली आहे (निळोबा गाथा पृ. ३३५ ). तींत त्यास महाविष्णूचा अवतार म्हटले आहे. व तीत भागवत टीका, नारायण आत्मबोध यांचा उल्लेख आहे. ९६ अर्वाचीन कोशकार रघुनाथशास्त्री गोडबोले यांनी रामदासतुकाराम द्वैतकल्पनेचा निषेध पूर्वी केला आहे. तुकाराम तुकारामावर वाङ्मय पुष्कळच आहे. खुद्द तुकारामाच्या अभंगांतच त्याचें आत्मचरित्र पुष्कळ येते. येथें कांही तुरळक लेखांकडेसच महिपतीचें एकनाथ चरित्र भतलीलामृतांत लक्ष ओढीत आहे. आहे (अध्याय १३ - २४ ) . रामदास रामदासांच्या संप्रदायांतील सर्वात मोठा रामदासचरित्रावर ग्रंथ म्हटला म्हणजे दास- विश्रामधाम हा होय. रामदासांची चरित्रे विसाच्या वर आहेत. उपलब्ध आणि उल्लेखित पण अनु- पलब्ध अशा चरित्रांची यादी देवांनी रामदास- रामदासींत दिली आहे.रामदासांच्या रामजयंतीचे महत्त्व एक आज नांव ठाऊक नसलेला कवि वर्णन करतो (काव्यसंग्रह ग्रंथांक १४ ). त्यांत " आरंभिति मग रामजयंती अवलोकिति जन संत निधान । ठायीं ठायीं कथापुराण | साधुजनां हें वृत्त समजतां करित अले पथि हरिगुण गान । ध्याति सतत हो हनुमत्प्राण । रंगनाथ, शिवराम, निरंजन, केशव आनंदमूर्ति महान । तुकाराम, जयरामहि मान । शेख महंमद, वामन पंडित शिवदिन साधू सर्वसमान । किति गायक पंडित विद्वान् ऐसे अनंतसंतहि दासा भेदुनि पाहती भगवदूध्यान ॥” I असे वर्णन केले आहे त्यावरून रामदासाचा सज्जनगड हें एक संतसंमेलनाचें स्थान झालें होतेसें दिसतें. यांत तुकोबा सज्जनगडी दिसत असत असा उल्लेख आहे. या उल्लेखावरून व तुकोबाविषयीं रामदासांनीं जीं मागें प्रशस्तिवाक्यें लिहिलीं होतीं त्यावरून रामदास व तुकाराम यांत द्वैत होतें या प्रकारच्या संशयास जागाच उरत नाहीं. काव्यसंग्रह ग्रंथांक ४७ मध्ये खंडेरायकृत तुकारामचरित्र आहे. त्यांत एक तुकारामाची कथा वर्णन केली आहे. सुप्यामध्ये वेळो- जीपंतांचे राज्य होतें. त्या वेळोजीपंतानें गांवां- तल्या एका विठ्ठल नांवाच्या ब्राह्मणाच्या सुंदर स्त्रीचा अभिलाष घरला आणि ती वश होईना म्हणून सूड घेण्यासाठी विठ्ठलावर २०० रुपये खोटी बाकी काढली. त्या प्रसंगीं तुकारामानें आपला कसा त्या ब्राह्मणास दिला इत्यादि कथा त्यांत आहे. महिपतीनें तुकारामाचें चरित्र भक्तविजय अध्याय ४८-४९ यांत दिले आहे. शिवदिनकेसरीने “धन्य तुकोबा कीं । बा धन्य तुकोबा कीं " असें एक पद लिहिलें आहे. (का. सं. ग्रंथांक ३५). तुकारामाची निळोबांनी जी स्तुति केली आहे ( आपटे - निळोबा गाथा पृ. १९५ ) तींत तुका- रामविषयक माहिती नाहीं. तींत तुकोबाविषयीं आपली भक्ति व्यक्त केली आहे. " वसंताच्याईक्षणमात्रे, पल्लवपत्रे फळें वृक्षा याप्रमाणें गुरुप्रसादाने आपणांस कवित्व आले अशी भावना तो दाखवितो. शिवाय 66 "! पशुमुखें ज्ञानेश्वर । करविला उच्चार वेदघोषु ॥ तैसेच तुम्ही मजही केलें । सामर्थ्यं वदविलें आपुलीया " असें सांगतो, तो तुकारामाच्या अभंगांच्या बुडविलेल्या वह्या तरल्याची कथा तेथें सांगत