पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यच्छ्रवणप्राप्तमोह रसरस ॥ श्रीहरि, टाकुन धां शिवहि म्हणे गिरिजे तूं कबिराचा एक दोहर। परिस | जो ऐकिल्या परमसुख मज देतो कोटि मोहरांपरिस | (नारायणकृत कबीरजन्मचरित्र. काव्यसं. ग्रं. ३८) चांगदेव ग्रंथांक चांगदेवचरित्र - लेखक शामजी गोसावी मरुद्रण ( महराष्ट्रकवि आणि काव्यग्रंथ, १) हें चरित्र ज्ञानेश्वर प्रतिस्पर्धी आणि मुक्ता- बाईचा शिष्य चांगदेव याचें नव्हे तर ग्रंथका राचा दहावा पूर्वज चांगदेव मुधेश याचें आहे व ग्रंथकार यास चांगा वटेश्वर याचा अवतार समज- तात. तथापि या चरित्रांत ज्ञानेश्वर - चांगदेव आख्यान प्रारंभींच आहे. तथापि हेंच पुस्तक महिपतीच्या हाती लागून त्यानें यावरूनच भक्त- लीलामृतांतील ९ वा व १० वा अध्याय लिहिला असें भावे प्रस्तावनेंत सांगतात. (काव्यसंग्रह प्रं. ४७ ). निळोबाचें चांगदेवचरित्र मागें उल्लेखिलेंच आहे. नामदेव खंडेराय कवीनें नामदेवाचें जें अभंगमय चरित्र लिहिले आहे त्यांत नामदेवाला बापाने आपले कापड विकावयास पाठविलें तेव्हां तें नामदेवानें गणपतीस दिलें आणि एक महि- न्यानें पैसे द्या असें सांगितलें. मुक्या गणपतीनें पैसे आणले नाहींत तेव्हां त्या गणपतीस आणखी एका महिन्याची मुदत दिली तरी गणपतीनें पैसे आणून दिले नाहीत. म्हणून त्याने शेवटीं 'कूळ'च उचलून आणलें आणि घरीं देव्हाऱ्यांत ठेवले पण त्याचें सोनें झालें इत्यादि कथा आहे. मोरोपंत मोरोपंताची “ नामदेवस्तुति " १५ आर्या आहे (तुकारामतात्या नामदेवगाथा ). या गायें- चरित्रकार तच कबीराचे नामदेवावर ९२ दोहे आहेत व गोरा कुंभाराचे ४ अभंग अगोदर दिले आहेत. नामदेवाचें चरित्र दाखविणारे त्याचेच समजले जाणारे अनेक अभंग आहेत. उदाहरणार्थ - (१) नामदेवास गुरु करण्याविषयीं देवाचा बोध, (२) नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यास नामदेवाचा बोध, (३) नामदेवचरित्र (१) (४) नामदेवाचा देवाबरोबर संवाद, (५) नामदेवाचा संकल्प व त्यास अभंग करण्याविषयीं देवाचें साहाय्य. संत सखूबाई विठ्ठलकविविरचित सखूचरित्र साकीवृत्तांत आहे. यांत केवळ भक्त म्हणून तिचा उल्लेख केलेला आहे (काव्यसंग्रह, ४७ ). भानुदास विठ्ठलकवीनें भानुदास चरित्र साक्यांत लिहिलें आहे, त्यांत विद्यानगरच्या म्हणजे विजयानगरच्या राजाचा वृत्तांत आणला आहे. (काव्यसंग्रह ४७). एकनाथ मुक्तेश्वराचें एकनाथचरित्र ९४ ओव्यांचे आहे. हें चरित्र अगोदरचे असल्यामुळे आणि मुक्तेश्वर हा एकनाथाचा नातू होता हें लक्षांत घेतां याचे महत्त्व विशेष आहे. याशिवाय मुक्ते- श्वरानें एकनाथ, ज्ञानदेव यांच्यावर आरत्या लिहिल्या आहेत. एकनाथाचें एक चरित्र खंडे- राय कवीचें आहे, तें साकीवृत्तांत आहे. या चरित्रांतील पालुपद आज सर्वतोमुखी झालें आहे तें म्हटलें म्हणजे "बरवीं संतचरित्र हो । पावन परम पवित्र हो । " हें होय. या पालुपदाचा गावी संतचरित्रे हो असाहि पाठ ऐकू येतो. याचें एकनाथी भागवतावर देखील काव्य आहे असें काव्यसंग्रहसंपादक लिहितात ( काव्यसंग्रह ग्रंथांक १४, पृ. १५८) “बरवीं संतचरित्र हो ।” लोकप्रिय झाले याचें कारण हेंच धृवपद अने- कांनीं वापरले आहे. उध्दवचिदनानें, नाग- नाथाच्या व इतर चरित्रांच्या आरंभीं हेंच धृपद