पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्य परीक्षण आतां अनेक कवींचा परामर्ष घेणारे आणि याचा देणारें वाङ्मय सोडून विशिष्ट कवीवर कोणकोणतें वाङ्मय आहे याविषयीं अर्धकच्चें केलेले टिपण पुढे मांडतों. प्रथम ज्ञानेश्वरावर असलेलें वाङ्मय उल्लेखितों. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर चतुष्टयाच्या चरित्राला त्यांचे ग्रंथ हेंच महत्वाचें चरित्रसाहित्य आहे. कारण त्यांत स्वकु- टुंबीय गोष्टींचा उल्लेख आहे. इतर ग्रंथकारांचें साहित्य मांडतांना नामदेवास अग्रस्थान दिलें पाहिजे. तुकारामतात्याकृत नामदेवाच्या गाथेंत ज्ञानेश्वरचरित्रविषयक अनेक प्रकरणे आहेत. (१) ज्ञानदेवाच्या भेटीसाठी नामदेवाची आळ, (२) ज्ञानेश्वराचे भेटीस नामदेव आले ते अभंग, (३) तीर्थावळीचे अभंग (४) ज्ञानदेव आणि सोपानदेव यांच्या समाधीचे अभंग (५) वटेश्वरनमन (६) मुक्ताबाईच्या समाधीचे अभंग, निवृत्तीनाथ यांच्या समाधीचे अभंग, ज्ञानदेवनामदेव संवाद इत्यादि विसोबा खेचर, सेना न्हावी हे नामदेवास उल्ले- खितात आणि चोखामेळा मुक्ताबाईस उल्लेखितो, कान्हुपात्रा ज्ञानेश्वराची स्तुति करते. रामदास रामदास देखील ज्ञानेश्वराचा उल्लेख करतो. " बोलविला वेद रेडा ज्ञानेश्वर वचनासाठीं । कबीराचे मागीं बैसे जाठ्याचे शेत राखीं । सूर- दास मिराबाई, गुंतलासि त्यांचे भाकीं । पैठणी एकनाथ गंधाचा वाहे धाकी । शबरीचीं उच्छिष्ट बोरें आवडीनें देव चाखी। बोधल्या तुकोबाची दाविली साक्ष जगाशी ॥ विसोबा खेचराची पाऊलें देव सोशी ॥” यांत कांहीं नवीन माहिती नाहीं. तथापि हैं अवतरण करण्यांत हेतु असा आहे कीं, ज्ञाने- श्वरापासून जो भक्तिसंप्रदाय स्थापन झाला त्यांत आणि रामदासस्वामींत कांहीं विरोध होता अशी समजूत चुकीची आहे. हें प्रत्यक्ष रामदासांच्या शब्दांनीं सिद्ध व्हावें. रामदासस्वामीकडेच जाण्या तुकारामानें शिवाजीला सांगून त्यांच्याविषयीं आदर व्यक्त केला आहे तर ज्ञानेश्वरापासून तुका- रामापर्यंतच्या सर्व संतकवींच्याविषयीं रामदासांन आदर व्यक्त केला आहे हें बरील रामदासोक्ती- वरून समजून येईल. शिवदिन केसरी ज्ञानेश्वरावर पद लिहितो त्यांत, “अद्वैत बोधें डोला । ज्ञानदेव ज्ञानदेवबोला" ज्ञानी विज्ञानी राजा । ज्ञानदेव सद्गुरू माझा" अशी वाक्यें आहेत. (काव्यसंग्रह ग्रंथांक ३५). मालोनाथ मालोनाथकृत नाथनामावलीत ( काव्यसंग्रह ग्रं. ३८ पृष्ट १४० ) ज्ञानेश्वराविषयीं " प्रतापें गुणें आगळा सूर्य जैसा । स्वयंजोति शुद्धप्रका- शीत तैसा । जयाची असे या जगीं पूर्ण सत्ता । नमस्कार माझा तया ज्ञाननाथा ||" असे उद्गार आहेत. निळोबा निळोबाने ज्ञानदेवाच्या परंपरेवर लिहिलें आहे आणि तींत आदिनाथ आणि श्रीशंकर यांचें ऐक्य दाखविलें आहे. आरतीमध्ये भिंत चालणें, पशूकडून वेद बोलविणें, १४०० वर्षे चांगदेवाचें जगणे यांचा उल्लेख केलाच आहे. चांगदेवाचें चरित्र देखील निळोबांनीं लिहिले आहे. कबीर याच्याविषयीं उल्लेख चोहोंकडे पसरले आहेत. तथापि एका चरित्राकडे त्यांतील एक उतारा देऊन येथें लक्ष ओढतों. हा उतारा याच्या काव्याविषयीं अभिनता दाखविणारा आहे. " स्नान करुनि गंगेचें गेला तो भक्त कबिरभवनातें । मग सद्गुरुप्रसादें नित्य करितसे विचित्र कवनातें ॥ विद्वज्जनमान्य असे बिरचित कवन दोहरा सरस ।