पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भीमस्वामी शिरगांव मठाधिपति, भक्तलीला- मृत; यासंबंधानें सविस्तर हकीकत मागें दिलीच आहे. भीमस्वामी - शहापूरकर तंजावर मठपति; श्री समर्थचरित्र. याचें एक संतचरित्र आहे म्हणून भावे आपल्या पहिल्या सूचीत सांगतात. [ एकंदर तीन भीमस्वामी भावे उल्लेखितात व त्यांच्या ग्रंथांसंबंधानें त्यांनीं घोटाळा केलेला आहे. दुसऱ्या सूचींत भीमस्वामी या नांवाच्या दोन मंडळींचा उल्लेख केला आहे.] मध्वमुनि - धनेश्वरचरित्र, सखुचरित्र. मन्मथशिवलिंग – गुरुचरित्र. माधव - सखुचरित्र. मालो - नाथनामावलि ( ग्रंथसंग्रह ३८ ) . मुकुंद - एकनाथचरित्र ( प्रसिद्ध ). मुक्तेश्वर - एकनाथचरित्र (का. संग्रह ). मुकुंद ( १ ) - रामजी गोसावी (चांदोरकर संग्रह ). मुकुंद (२) - ताबाजी बाबावर्णन. महिपती - सविस्तर वर्णन दिलेंच आहे. मुद्गल अनंतसुत - नामदेवचरित्र ( चांदोरकर संग्रह ). मृत्युंजय - गुरुलीला. मेरु-समर्थाष्टक, संतमाला. हीं पुस्तकें भावे उल्लेखितात पण तीं खरोखर यांस उपलब्ध होती किंवा नव्हतीं हें कळत नाहीं. मेरुस्वामी- कृत समर्थांचें कसलेंहि चरित्र उपलब्ध नाहीं म्हणून देव सांगतात ( समर्थांची दोन जुनी चरित्रे पृ. ११ ). मोरोपंत - सविस्तर विवेचन पुढे आहेच. रंगनाथ - भानुदास चरित्र ( महाराष्ट्रकवि ). रत्नाकर - गुरुपरंपरा (चांदोरकर संग्रह ) सद्गुरु अष्टक, संगमचरित्र. रमावल्लभदास - गुरुवळी. रघुनाथ - रामदास वर्णन. राघव - दामाजीचें चरित्र (का.सं). २३ saferकार राघवदास - रमावल्लभदास महिमा. राजाराम प्रासादी -भक्तिमंजरीमाला. रंगनाथ निगडीकर - संतमालिका. लक्ष्मण बावाकृत श्रीगुरुस्तवराज (उपलब्ध अप्रकाशित ). वामन पंडित - तुकारामस्तुति. विठ्ठल बीडकर - कबीर कथा, सखूचरित्र, भानु- दासचरित्र (का.सं). विठ्ठल केरीकर - कबीरकथा ( आर्यावृत्त) [ भावे यांनी दोन्ही विठ्ठलाच्या नांवावर कबीरकथा घातली आहे पण पुस्तकांत बीड कर विठ्ठलाच्या कबीरकथेविषयीं कांहीं एक उल्लेख नाहीं व दोन विठ्ठलांच्या दोन कबीरकथा होत्या असेंहि सांगितलें नाहीं. वेणीस्वामीकृत श्री समर्थ प्रताप. अप्रकाशित, अगदी थोडा भाग उपलब्ध ( देव ). व्यंकटेशसुत-बोधलेबोबांचें चरित्र. शामजी गोसावी- चांगदेवचरित्र. शिवराम - संतमालिका. शिवरामबुवा - संतमालिका. [ १ ल्या सूचीत शिवराम नांवाचे दोन कवी देऊन संतमालिकानांवाचीं प्रकरणें दोघांच्याहि नांवावर घातली आहेत आणि त्याबद्दल पुरावा पुस्तकांत कोठेच नाहीं. एका शिवरामाच्या संत- मालिकेचा उल्लेख मागें केलाच आहे. ] शिवसुत प्रभु - संतनामावळी. शंकरदास - निरंजनचरित्र. श्रीधर --चोळराजचरित्र. श्रीधर - दासोपंतचरित्र ( प्रसिद्ध ). श्रीरंग नारायण - शालिसुमनचरित्र. सच्चिदानंद - ज्ञानेश्वर चरित्र ( ! ). सरस्वती गंगाधर - गुरुचरित्र. सत्यामलनाथ - नवरत्नमाल (ज्ञानेश्वर चरित्र ). सदानंद - संतमालिका. संतदेव - संतवैभव. हनुमंत स्वामीकृत - रामदासचरित्र (प्रकाशित).