पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरक्षिण स्पष्टीकरण केलें नाहीं. एवढेच नव्हे तर उपलब्ध आणि अनुपलब्ध यांची भिन्न मांडणी केलेली नाहीं तथापि यांत उल्लेखिलेल्या ग्रंथांचा पत्ता लावर्णे आणि कै. भावे यांनी ज्या चुका केल्या आहेत त्या तपाशीत बसणें हा उद्योग त्यांनीं पुढच्या अभ्यासकांसाठीं ठेवला आहे. भाव्यांच्या याद्यांत, रामदास आणि रामदासी ग्रंथमालेत आणि संतकविकाव्यसूचींत मिळून पुढील चरि- त्रकारांचीं आणि त्यांच्या ग्रंथांची नांवें सांपडतात- अमृतराय - दामाजीपंत ( का . सं ). आत्माराम स्वामी-रामदास स्वामी चरित्र (प्रका शित); दासविश्रामधाम प्रकाशित. - आदिनाथ - नाथलीलामृत ( भावेसंग्रह ). आनंदतनय - कविवर्णन ( भावसंग्रह ). आनंदनाथ-भक्तिमंजरी. हें पुस्तक नावे यांच्यापाशी आहे अशी समजूत सं. क. का. सू. दाखविते. पण या पुस्तकासंबंधानें भावे कांहींच सांगत नाहींत. उद्धव-रामदासचरित्र (छापले आहे). उद्धवदास - संतमाला. उद्धवसुतकृत - समर्थचरित्र ( प्रकाशित ). केशव - एकनाथचरित्र रचनाकाल श. १६८२ ( मुद्रित ). खंडेराय-एकनाथ, तुकाराम, नामदेव यांची चरित्रे, तुकारामचरित्र. (का. सं ). खानवलकर गंगाधर नारायणकृत - रामदास- चरित्र (उपलब्ध अप्रकाशित ). गिरिधर - श्रीसमर्थप्रताप. गोविंद - नामदेवचरित्र ( चांदोरकर संग्रह ). गंगाधर बावाकृत - रामदास चरित्र उपलब्ध (अप्रकाशित). जनार्दन - दामाजीचें चरित्र ( का . सं . ) . जयरामात्मज - संतमालिका. तुकाविप्र-भानुदासचरित्र ( चांदोरकर संग्रह ) एकनाथस्तोत्र. ९२ दासबाबा - कबीर आख्यान. दिगंबर - संतविजय. धुंडित कुमार - भक्तिसार, मालोतारण. [हा ग्रंथकार नरहरि धुंडिराज मालू हाच तर नसेल ना ? या ग्रंथकाराचे नांव पहिल्या सूचीत . भाव्यांनी दिलें आहे पण त्याविषयीं आपल्या पुस्तकांत कांहींच लिहिलें नाहीं. यावरून हें पुस्तक भाव्यांनी पाहिलें होतें किंवा नाहीं हें कळत नाहीं. नरहरि मालोच्या नांवावर पुढें भाव्यांनीच भक्तिकथासार आणि मालोतारण हे ग्रंथ दिलेच आहेत आणि ते दोन्ही ग्रंथ अि श्वसनीय आहेत असें त्यांचं मत पूर्वी दिलेच आहे नरहरि धुंडिसुतकुमार हे दोघे एकच असावेत असें वाटतें. म्हणजे या ग्रंथकाराचे चरित्रपर दोन ग्रंथ होतात; ते म्हटले म्हणजे भक्तिकथासार नवनाथचरित्र हे होत. भक्तिसार हे नवनाथ - चरित्र या पुस्तकाचेच दुसरें नांव आहे आणि आहे असें सं. क. का. सू. म्हणते]. याचा रचनाकाल शके १७४० म्हणजे सन १८१८ नरहरिसुत - मुकुंदराज चरित्र (देव). नामदेव (१) - मिराबाई (छापलें ). नामा पाठक - नामरत्नमाळ. नारायण कवि - कबीराशन. निरंजन - केशव चैतन्यकथा. निरंजनमाधव - ज्ञानेश्वर विजय. परशुराम - आनंदमूर्तिवर्णन, गुरुचरित्र, गुरु- चरित्रसार वगैरे. पांडोबा - रामदासचरित्र ( भावसंग्रह ). बहिर जातवेद-संतनामावलि. बहिरवनाथ - नाथलीलामृत ( कविचरित्र ). बाबुसुत - गोमा उचरित्र. बाळ - श्री भक्तमालिका. बालकराम – दामाजीची रसद ( देवसंग्रह ). ब्रह्मगिरि- दामाजीपंताची बखर (का.सं.).