पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म बाबाजी गोसावी या दोघांचींच चरित्रे आहेत. भक्तमंजरी नांवाचें महिपतीचें एक पुस्तक सं. क. का. सू. प्रश्नचिन्ह करून उल्लेखिते. (७) भीमस्वामी - ग्रंथ भक्तलीलामृत, अभंगमय शके १७१९ मध्ये लिहिला. श्रीसमर्थांची दोन जुनीं चरित्रे या पुस्तकांत छापलीं आहेत. यांत श्रीसमर्थ संप्रदायाची अनेक मंडळी त्याप्र- माणेंच भानुदास, एकनाथ, वामनस्वामी, नाम- देव सारख्या मोठ्या व्यक्तींची व रामभट पोळे, दोन कृष्णाजीपंत यासारख्या सामान्य व्यक्तींची चरित्रे आहेत. चरित्रसंख्या ४१. (८) राजारामप्रासादी - ग्रंथ भक्तमंजरी, १०९ अध्यायाचा ग्रंथ. “साधारणपणें महिपतिबावानी वर्णिली नाहीत. अशा साधुपुरुषांचीं चरित्रे गाण्याचा कवीचा अभिप्राय दिसतो. माहिती कशी मिळविली हे नीटसे कळत नाहीं. पण ती बरीच प्रयासाने मिळविलेली दिसते. ग्रंथांत परं- परा समकालीन संत व जन्ममृत्यु वगैरेचे शक राजा- रामबुवांनी अनेक ठिकाणी सांगितले आहेत." ग्रंथपूर्णता शके १७५६ म्हणजे अव्वल इंग्रजीत झाली. या ग्रंथाचें नांव भक्तमंजरीमाला असें चांदोरकर सूचींत सांगतात. व हा देवांच्यापाशीं आहे असा स्थान संदर्भ देतात. (९) नरहरी धुंडीराज मालू-ग्रंथ (१) मालू- तारण व (२) भक्तिकथामृत. भक्तिकथामृतांत ६४ अध्याय आहेत. ग्रंथकार मोठा पण काल्पनिक व पूर्ण खोटा. चुकीची माहिती गोळा केली असें नसून बरीच काल्पनिक माहिती तयार केली असें भावे सांगतात. हा ग्रंथ छापला आहे, असें सं. क. का. सू. सांगते. हा मी पाहिला नाहीं. मालुतारण हाहि ग्रंथ खेळखंडोबांनी भरला आहे असें भावे सांगतात. कै. भावे यानीं उल्लेखि- लेल्या चरित्रग्रंथांपैकीं मार्तेङबुवा, दासोदिगंबर, राजाराम प्रासादी आणि नरहरी मालु यांचे ग्रंथ भी वाचले नाहींत. याशिवाय या प्रकारचेच चरित्रकार दुसरे काहीं ग्रंथकार व ग्रंथ संतकवि काव्यसूचींत उल्लेखिले आहेत ते येणेंप्रमाणे - हे ग्रंथ देखील मी पाहिले नाहींत. विसा खेचर - संत मणिमाला (चांदोरकर सं . ) . मेरु- संतमाला. विठ्ठल- संतचरित्र (चांदोरकर संग्रह ). उद्धव मुल्हेरकर - संतमाल ( चांदोरकर सं.). श्रीधर संतप्रताप - (महाराष्ट्रकवि ). मालो-संतचरित्र (कोठे उपलब्ध झाला में सांगितलें नाहीं ). भीमयशवंतसुत - संतचरित्र रचनाकाल शके १७१९. दिगंबर - संतविजय (चांदोरकर ). पेवदास चैतन्यांकित-संतमालिका. रचनाकाल शके १६०८ ( काव्यसंग्रह ). बस्वालंग-संतमालिका ( चांदोरकर सं . ) . रंगानुजात्मज - संतमालिका (देव सं.). सदानंद - संतमालिका ( चांदोरकर सं.). संतदास-संतवैभव; रचनाकाल शके १६३४ (चांदोरकर सं.). भावे यांच्या महाराष्ट्र सारस्वत या पुस्तकांत दोन सूचि दिल्या आहेत त्यांपैकी पहिली सूचि ही या ग्रंथाची सूचि मुळींच नाहीं. कवींची नांवें व त्यांच्या नांवावर खपणारी पुस्तकें यांची नोंद त्यांत आहे. त्यांत जे अनेक लेखक सांगितले आहेत त्यांचा "महाराष्ट्रसारखत" ग्रंथांत उल्लेख नाहीं व ग्रंथांत दिलेल्या अनेक लेखकांचा या यादींत उल्लेख नाहीं. उदाहरणार्थ, अवचितसुत- काशी यांचा उल्लेख या यादीत नाहीं. म्हणजे ही सूचि पुस्तकांत आलेले सर्व ग्रंथकार देणारी व आणखीहि ग्रंथकार सांगणारी मुळींच नाहीं, शिवाय अमुक कवीचें नांव कोठून मिळालें, प्रथा- संबंधानें माहिती कोठून घेतली, यासंबंधाने कांहींच उल्लेख नाहीं. मुख्य दोष हा कीं त्यांनी ग्रंथ प्रकाशित आहे कीं अप्रकाशित आहे याचे