पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ा ण असे म्हणून श्री शंकराचार्योपासून सुरवात करून ज्ञानेश्वरकालापर्यंत यादी आणून त्यांत ९१ नावें घालतो. यांत अनेक संतकवी उल्लेखिले आहेत, त्यांचीं नांवें इतरत्र सांपडत नाहींत म्हणून ही यादी महत्त्वाची आहे. पुढे एकनाथापासून रामदासाच्या कालापर्यंत ४६ संतकवींचा उल्लेख करतो व त्यासाठीं जें प्रस्तावनावाक्य लिहितो तें येणेंप्रमाणे आहे- "कोणी ब्रह्मनिष्ठ गुरु भजनी । कोणी वीतरागी रत सगुणीं । भाविक नाम कीर्तन कोणी । सज्जन, श्रवण करावें श्रवणीं ॥" पुढील एका कटिबंधांत हरीचीं नांवें जपतां भवसागर लोक तरले म्हणून विष्णूची नामावली देतो व पुढे एका कटिबंधांत द्रौपदीचें संकट कृष्णानें कसें दूर केले म्हणून सांगतांना अनेक प्रकारच्या साड्यांची यादी देतो. ही यादी कवीच्या काळच्या बाजारांत स्त्रियांच्या वस्त्रांचा माल पुष्क- ळच विविध येत होता असे दाखविते. सुमारें १०० प्रकार या कटावांत वर्णिले आहेत. रा. भावे यांच्या महाराष्ट्र सारस्वतांत खालील संतचरित्रकार (प्रकरण २३) व त्यांचे ग्रंथ उल्ले- खिले आहेत. (१) नाभा - भक्तमाला. नाभा इ. स. १६७८ च्या सुमारास होऊन गेला. भक्तमालेत १९७ छप्पा आहेत. भक्तमालेंत फक्त याद्याच आहेत. (२) प्रियादास - भक्तिरसबोधिनी. प्रियादास नाभाचा शिष्य होता व प्रस्तुत ग्रंथ भक्तमालेवर टीका आहे. म्हणजे जरा सविस्तर वर्णने आहेत. प्रियादासाच्या ग्रंथांत ज्ञानेश्वर, नामदेव व एक- दोन संत खेरजि इतर संत महाराष्ट्राबाहेरचे आहेत. (३) मार्तडबुवा - भक्तिप्रेमामृत, प्रियादासाच्या ग्रंथावरून मराठीत केलेला ग्रंथ. (४) उद्धवचिद्धन-याची (१) जीं किरकोळ चरित्रे या प्रकरणांत उल्लेखिलीं आहेत त्यापेक्षां निराळा संतचरित्रात्मक ग्रंथ असावा अशी भाव्यांची खात्री होत नाहीं. माघवदास अलक्ष. निधनांत उद्धवचिद्धनानें (२) "भक्तमालिका " लिहिली असें सांगतो. चरित्रात्मक ग्रंथाचें नांव 66 भक्तकथामृतसार" किंवा असेंच दुसरें कांहीं असेल असेंहि भाव्यांस वाटतें. असा ग्रंथ पाहि- त्याचें भिंगारकरबुबा सांगतात व उतारा देतात. पण त्यावर भाव्यांचा विश्वास बसत नाहीं (३) संतमाला ग्रंथ प्रसिद्ध आहे. पण हा यादी सारखाच जवळजवळ आहे. उद्धवचिद्धन हा नाभाशिवाय महिपतीचा भक्तविजय लिहितांना मुख्य आधार होता. भक्तकथामृतसार हा ग्रंथ भावे यांच्यापाशीं आहे असें सं. क. का. सू. कारांनी दिलें आहे. पण तो ग्रंथ आपल्यापाशीं नाहीं म्हणून भावेच सांगतात. तसेंच भक्त- कथातत्त्व हे उद्धवचिद्धनाचे पुस्तक भावे यांच्या संग्रहांत असल्याचा सूचीकार उल्लेख करतात, पण भावे यासंबंधाने कांहींच माहिती दाखवीत नाहींत. भिंगारकरापाशीं पुस्तक आहे व ते आप- णाला मिळेलच अशा समजुतीनें भावे यांनी आपणापाशीं तें पुस्तक आहे असें चांदोरकरांस सांगितले असावेसें दिसतें. (५) दासादिगंबर - संतविजय ग्रंथ उपलब्ध आहे. यांत कवीनें नाभाजीच्या ग्रंथाचा उल्लेख केला आहे. बऱ्याच नवीन आख्यायिका आहेत. (६) महिपतीबोवा ताहराबादकर - (१) भक्त विजय. हा ग्रंथ नाभा व उद्भवचिद्धन या दोघांच्या आधारे लिहिला असें महिपती म्हणतो. तरी याखेरीज इतर माहिती बरीच आहे. ती कोणती व कशाच्या आधाराने लिहिली असावी याचा उहापोह भाव्यांनी केला आहे. (२) पांडुरंग- महात्म्य यांत पुंडलिकाचें चरित्र आले आहे. (३) संतलीलामृत, शके १६८९ मध्ये पुरा केला. (४) भक्तलीलामृत, १६९६ मध्ये पुरा केला. (५) संतविजय हा पूर्ण नाहीं. यांत रामदासस्वामी