पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नामावळ्या करण्याचा हव्यास संतकवींच्या काळापासून पेशवाई अखेरपर्यंत बराच असावा असें दिसतें. भक्तांच्या नामावळीवर होनाजी बाळानें एक लावणी देखील केली आहे तिच्यांत सुमारें १५० नावें आहेत (होनाजी बाळाकृत लावण्या, 'चित्रशाळा - १९०८ पृ. ७० ). मालोकृत नाथनामावली भुजंगप्रयात वृत्तांत आहे ( काव्य सं. ग्रंथांक ३८ पृ. १३९). हांत आदिनाथ, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, गैनि- नाथ, निवृत्तिनाथ, ज्ञाननाथ ( ज्ञानेश्वर), रंग- नाथ, प्राणनाथ, गैबीनाथ, गुप्तनाथ उद्बोधनाथ, केशरीनाथ, लक्षुमीनाथ, शिवदिन अथवा गोविंद भोळा, हरीनाथ आणि मालोनाथ अशी परं परा दिली आहे व प्रत्येकावर कांही तरी - कवीच्या दृष्टीनें - समर्पक असा श्लोक आहे. मोरोपंतांनी ज्या संतकवींच्या याद्या दिल्या त्यांत सन्मणिमाला ही मुख्य आहे पण दुसरीहि एक महत्त्वाची यादी आहे ती म्हटली म्हणजे सन्नामगर्भरामायण ही होय. हींत गणपति, सर- स्वती, कुलदेव, गुरु, शिव, विधि, नारद, प्रहाद इत्यादि दैवतांचीं व पौराणिक पुरुषांचीं नांवें आहेत. तीं परीक्षितिपर्यंत आणल्यानंतर एकदम मराठी संतकवि घेतले आहेत. त्यांनी ज्या संत- कवींच्या नांवाचीं अक्षरें आपल्या आर्यात गोंवून दिलीं आहेत ते संतकवी येणेंप्रमाणे - ( १ ) निवृत्ति, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, चांगदेव, भानु- जनार्दन, एको, वामनस्वामी, श्रीधर, केशव, गणेश, अनंत, कृष्णदास, जयराम, आनंदमूर्ति, रंगनाथ, रामदास, कल्याण, उद्भवचिदन, केशव- स्वामी, शिवराम, पुरंदर, दासोपंत, दामाजीपंत, रामानंद, कबीर, रोहिदास, मलूकदास (४५ व्या आर्येत नांव नाहीं). पीपाजी, धनाजाट, नानक, मीराबाई, कर्माबाई, सेनान्हावी, माधवदास, तुळ- सीदास, मनसुखदास, रामप्रसाद, त्रिनयनवाणी, नरसिंह मेहेता, केवळ कूबाजी, श्रुतदेव, सुदाम- दास, १२ " देव, नामदेव, लाखाभक्त, जनी, गोराकुंभार, सांवतामाळी, विसोबा खेचर, चिंचवडकर देव दामोदर देव, तुकावाणी, बोधला, मालोपंत, मुद्गल, बहिराापसा, परसा भागवत, हरिनारायण, मुकुं- दराज; मुक्तेश्वर, कृष्ण दयार्णव, जगमित्र नामा, आनंदतनय, निपटनिरंजन, मानकुरी, सूरदास केशवदास, भक्तमालाकार, बिहारी, भक्तविजय- कार, हरिविजयकार, वृंदावनवासी, अयोध्यावासी, काशीवासी, द्वारकावासी, सर्वक्षेत्रवासी, चोखा- मेळा, शंकराजी बाबा; नारायणबाबा शिवदिन, प्रहाद बडवे, अमृतराय, पांडोबा आपा, गोविंद- गोसावी, बाळकृष्ण बाबा, विठोबादादा, सकल हरिजन, बाबूराय सदाशिव, कालिदास, यानं- तर पंढरपूरवासी वैकुंठवासी बगैरे. संतकवींच्या याद्याच देणारी पद्ये कवींच्या याद्या देणाऱ्या पदांचा उल्लेख मागें केलाच आहे पण त्यांशिवाय दुसरे कित्येक लेखक आहेतच. जयरामात्मज कवीनें एक कटिबंध लिहिला आहे त्यांत अनेक भक्त संत व ग्रंथकार यांची नांवें दिली आहेत, (का. सं. ग्रंथांक ३५ पृ. १०१ ). त्यांत प्राचीन ऋषिकाळापासून जी सुर- वात केली आहे ती शिवाजीच्या कालापर्यंत आणून सोडली आहे. या कवीस याद्याच देण्याची आवड दिसते. व याद्या देण्यास कांहीं कारण शोधावें आणि यादी द्यावी म्हणजे याचा कटाव झाला. वरील नांवें देण्यास तो प्रस्तावना येणें- प्रमाणें करतो- 1 "तारक मार्ग दाविती लोकां । बोधें हरिती भव- भयशंका । जे संसारसागरी नौका । त्यांचीं नामें पावन ऐका...." ही १०५ वैदिक व पौराणिक नांवांची यादी झाल्यानंतर दुसऱ्या एका यादीस निमित्त म्हणून "झाले मुक्तचि निजज्ञानें । धाले बोध सुधारस पानें । त्यजिलें कामक्रोध अभिमानें । त्यांचीं परि- सावीं अभिधानें ।"