पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काम्यपरीक्षण नांवावर खपणाऱ्या चरित्रांत उत्तरकालीन साधूंचा देखील उल्लेख आहे. पण विशिष्ट व्यक्तीवर वाड्मय गोळा करतांना प्रथम तसले म्हणजे त्याच्या नांवावर खपणारे सर्व प्रथ जमा करून नंतरच ग्राह्याग्राह्यविवेक केला पाहिजे. समकालीन ज्ञानेश्वराच्या चरित्राला नाम- देवाचे अभंग उपयोगी म्हणून धरले जातात, नामदेवाने स्वतःवर लिहिलेच आहे, पण त्या शिवाय मिराबाई, कबीर, कमाल, नरसीमेहेता, जनाबाई, चोखामेळा यांचीं चरित्रे आहेत, चोखोबाच्या स्त्रीचें बाळंतपण म्हणून एक विशेष कात्र्य आले आहे. जनजसवंत, बोधलेबोवा, राका कुंभार, गोरोबा कुंभार, भानुदास, जगमित्र नागा यांची चरित्रे आहेत. परसोबा - नामदेव संवाद म्हणून एक स्फुट आलेच आहे. भानुदास व बोधलेबोवा यांचा उल्लेख ज्ञानेश्वर समकालीन नामदेव कसा करील? हा प्रश्नच आहे, पण तें चरित्र साहित्य आहे ही गोष्ट प्रथम लक्षांत घेत लीच पाहिजे. त्या साहित्याच्या कर्तृत्वाविषयीं संशय उत्पन्न होऊन तें नाकारणें ही क्रिया मागा- इन होईल एवढेच. ८८ संतचरित्रकारांमध्ये उद्धवचिद्धनाचा समा- वेश अवश्य केला आहे. यानें गाईलेले संत बरेच जुने दिसतात. त्याचे वर्ण्य संत म्हटले म्हणजे (१) नागनाथ, (२) हेगराज, (३) बहिरंभट, (४) मृत्युंजय, (५) गोरा कुंभार हे होत (काव्यसंग्रह ग्रंथ ३७ ). हीं सर्व चरित्रे साकी वृत्तांत आहेत. मृत्युंजयचरित्र हें बेदरच्या राज्यांत झालेल्या पुरुषावर आहे आणि त्यांत लिंगायत आणि वैष्णव यांचा तंटा दाखविला आहे. दासविश्रामधाम हैं आत्मारामकृत समर्थांचें जरी चरित्र आहे तरी त्यांत इतर साधूंचा सपा टून उल्लेख असल्यामुळे हा ग्रंथ संतचरित्रांना उपयुक्त टीपा जोडण्यास फारच उपयोगी पडेल. यांत २०० वर व्यक्तींचे उल्लेख आलेले आहेत. त्यांतल्यात्यांत या ग्रंथास सूची आहे त्यामुळे - शोधकास श्रम कमी पडतील. दासविश्रामधामांत अनेक ग्रंथकारांचे उतारे घेतले आहेत आणि त्यांवर धांवती टीका लिहिली आहे. त्यामुळे कोणते अभंग कोणाचे याविषयीं आत्मारामाचें मत दिले गेलें आहे. ग्रंथग्रंथकारविवेकास या ग्रंथाच्या प्रसिद्धीमुळे फांद्या फुटणार आहेत. असा उपयुक्त 'उपद्व्याप' देवांनी पुढच्या संशोधकांसाठी करून ठेवला आहे. संतकवींच्या याद्या संतकवींच्या अनेक याद्या उपलब्ध आहेत. त्यांपैकीं कांही याद्यांच्याच स्वरूपांत आहेत तर कांहींत याद्यांबरोबर कवींची त्यासंबंधानें वृत्ति दाखविणारी वाक्यें आहेत. महाराष्ट्रकवि, ग्रंथांक ९ मध्ये ५/६ याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या येणें- प्रमाणे - ( १ ) संतमालिका उद्धवचिद्धनकृत; (२) संतमालिका, जयरामसुतकृत; (३) संतमालिका, शिवरामकृत; (४) संतनामावली, रंगनाथकृत; (५) संतमालिका, उद्धवमुतकृत; (६) संतमालिका, सिद्धचैतन्यकृत प्रत्येक यादीला हेतु जोडलाच आहे. उदाहरणार्थ, उद्धवचिद्धन म्हणतो- “करितां भक्तांचे स्मरण । स्वयें तद्रुप होईजे आपण । जैसें हरिब्रीद संपूर्ण । श्रवणी ऐकोनी बोलतसे." जयरामसुत म्हणतो- " हरिजन हे हरिगुरु भजने, जन तारुनि आपण तरले । जे संसारसागरी नौका । नामें त्यांचीं पावन ऐका. । " सिद्धचैतन्य तर सरळपणें " “उठोनिया प्रातःकाळीं । जपा संतनामावळी । स्मरतां किल्मिष अवघें जाळी । देवपाळी आज्ञेसी । " असें म्हणून जपासाठींच नामावळी करण्याचा हेतु सांगतो. “ भक्तविजयाची आरती " म्हणून ३१ कडव्यांची आरती आहे. कर्ता गणेशसुत. हींत अनेक साधूंविषयीं सटीक माहिती आहे ( तुकारामतात्यांची नामदेव गाथा ). या प्रकारच्या