पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोरोपंत चरित्रासारखे अपवाद वगळतां, अजून सुरुवातच व्हावयाची आहे असें म्हणतां येईल. आज अर्वाचीन लेखकांनी अनेक संतकवींचीं चरित्रे लिहिली आहेत. पण त्यांनी कोणती माहिती कोणत्या आधारावर लिहिली याचें त्या चरित्रांत विधानच नसतें. भावे यांच्यासारख्या लेखकाने जरी मोठा आढावा घेतला आहे तरी आपल्या लिहिण्याची तपासणी करण्यास दुसऱ्यास सोपें जाऊं नये म्हणूनच कीं काय त्यांनी ग्रंथाचे आधार देण्याची टाळाटाळ केली आहे, असो झालें तें झालें. आतां पुढच्या कालां- तौल लेखकांनी काय करावें त्याविषयीं एव ढेंच लिहितों कीं, त्यांनीं प्रसिद्ध ग्रंथाचें प्रसिद्ध स्थान व शक्य झाल्यास प्रकाशनकाल देण्यास विसरूं नये व हस्तलिखिताचा उल्लेख करतांना तें हस्तलिखित कोणापाशी आहे हें देण्यास चुकूं नये. जेव्हां कवचें चरित्र लिहिण्याचा प्रयत्न होईल त्यांत पूर्वीच्या ग्रंथकारांनी काय लिहिलें आहे, त्या लिहिणाऱ्या ग्रंथकारांनी पूर्वीच्या कोणत्या अंथापासून घेतलेल्या भागांत काय बदल केला आहे याचें पृथकरण चांगले दिलें पाहिजे. प्रत्येक कवीस चरित्रकार मिळालेले आहेतच. कवीचे समकालीन लोक त्याविषयीं उल्लेख करीत तर उत्तरकालीन लोकहि उल्लेख करीत. कांहीं कवी स्वतःच आपल्या संबंधाने माहिती देतात. संत- चरित्रे एकत्र करण्याचें काम जर पूर्वी कोणी विस्तृत प्रमाणावर केलें असेल तर ने महिपतीनें होय. पण महिपतीच्या लेखाशिवाय साहित्य कितीतरी आहे. त्या साहित्याच्या स्वरूपाची ओळख व्हावी म्हणून पुढील टांचण प्रसिद्ध करीत आहे. हे टांचण पूर्ण तर नाहीच; पण महत्त्वाच्या कवींसंबंधाचें देखील संपूर्ण नाहीं. तर प्रस्तुत अभ्यास चालू असतां जे कांहीं ग्रंथ हाताला लागले त्यांत येणाऱ्या कविचरित्र साहित्याची नोंद केली आहे. ८७ 19 1 JAN 1994 तर ' अभ्यास करीत असतां केलेलें हातांचण ' याशिवाय त्यांस महत्त्व नाहीं तथापि हें टाचण वाढविण्यास बरीच मेहेनत पडेलसें वाटते. हें टांचण करतांना पूर्वीच्या ग्रंथांत आढळलेले अनेक ग्रंथनिर्देशविषयक दोष दूर केले आहेत. ज्यांस या प्रकारचा अभ्यास करावयाचा असेल त्यास हे कांहीं दिवसांचे परिश्रम उपयोगी देखील पडतील. उदाहरणार्थ, अनेक संतकवींचा उल्लेख अनेक याद्यांतून येतो. एक पूर्ण अशी यादी कोणतीच नाहीं. शिवाय प्रत्येक संत लेखक होता किंवा नाहीं हें आपणांस ठाऊक नाहीं. अनेक संतांची प्रथम संत म्हणूनच नांवें ठाऊक असतात व त्यांचे कांही ग्रंथ मागाहून सांपडले म्हणजे ते संतकवि म्हणून ठाऊक होतात. यासाठी असल्या याद्या जम- दिणें व त्यांतून मिळालेली माहिती संतकविकाव्य- सूचि सारख्या ग्रंथांत नसली तर ती नोंदून ठेवणें इत्यादि परिश्रम व्हावयास पाहिजेत. संतकवि - काव्यसूचीत संदर्भ बरे दिले आहेत पण त्यांत अपूर्णता पुष्कळच आहे. या सूचिकारांस कै. भाव्यांनी आपल्यापाशीं विशिष्ट ग्रंथ नसतां तो आहे म्हणून गप्पा मारून चुकविले असावें असा संशय येऊ लागतो. संतचरित्रे व याद्या अनेक आहेत ती एकत्र करून ग्रंयांत उल्लेखिलेल्या सर्व व्यक्तींचीं सूचि झाली पाहिजे, उल्लेखस्थळ दिले पाहिजे. आणि यासाठी आपल्याकडे ग्रंथ आहेत ते सर्व सूचीसह प्रसिद्ध करण्याची परंपरा स्थापित झाली पाहिजे, तसें केल्यास चरित्रलेखनाचें व पुढील अभ्यासाचे काम पुष्क- ळच सोपें होईल असो. संतचरित्रकार संतचरित्रकारांत नामदेवाचा उल्लेख प्रथम केला पाहिजे. यानें जितकें संतचरित्रावर अगो- दरचें साहित्य मांडलें आहे तितकें दुसऱ्या कोणीच मांडलें नाहीं. त्याचें म्हणून मांडलेलें सर्व साहित्य त्याचें नाहीं हें उघड आहे. कारण त्याच्या