पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण

प्रकरण १४ वे. चरित्रकार भाषांतरकार मूळाचा स्वीकार करून किंवा त्याग करून किंवा संक्षेप विस्तार करून आधार- ग्रंथाविषयीं आपलें काव्यपरीक्षण कसे व्यक्त करतात हैं मार्गे दाखविलेंच आहे. या विवे- चनामुळे कवींनीं काव्यपरीक्षणशक्ति वापरल्याचे आपणांस दिसून येईल. आतां चरित्रकारांनी चरित्राविषय होणाऱ्या व्यक्तीच्या ग्रंथाविषयीं कितपत परीक्षणवृत्ति दाखविली आहे हें पाहूं. संतचरित्राचें वाङ्मय मराठींत सपाटून आहे हैं पुढील आढाव्यावरून लक्षांत येईल. ८६ माझें पहाणें झालें नाहीं. आणि झाडून सारें वाङ्मय वाचून झालें नाहीं. प्रत्येक कवीवर काय वाड्मय आहे याची यादी आज असती किंवा अर्वाचीन चरित्रकारांनी प्रत्येक कवीवर ग्रंथ लिहितांना दुसऱ्या कवींनीं त्याविषयीं काय म्हटले आहे याची सविस्तर माहिती दिली अस तर माझें काम बरेंच सोपें झालें असतें. आज- गांवकरांनी आपली चरित्रे लिहितांना कोठून काय घेतलें हैं सरळ सांगितलें आहे तर याबद्दल त्यांचे साभार अभिनंदन केलें पाहिजे. परंतु भाव्यांनी हा सरळपणा ठेवला नाहीं. आपली माहिती कोठून आणली याचें मोठें गुढ करण्यांत कै. भाव्यांस आनंद होत असावा असें दिसतें. आणि यामुळेच यांच्या ग्रंथाची विश्वसनीयता पटत नाहीं. प्रस्तुत प्रकरणांत चरित्रवाखाय तपासण्याच्या बाबतीत झालेल्या फारच अल्प प्रयत्नांचें फल. देत आहे हें अर्थात कबूल केलें पाहिजे. या अपूर्णतेची कारणे अनेक आहेत. हे ग्रंथ मिळ- विण्याचीच केवळ नव्हे तर उल्लेखिलेला ग्रंथ कोठे आहे हे जाणण्याची अडचण सध्या फार आहे. वरींच चरित्रे अजून अप्रसिद्ध आहेत व त्यांची हस्तलिखिते मिळविणें सोंपें नाहीं. भावे व चांदोरकर हे दोघेहि दिवंगत झाले आहेत व त्यांचे संग्रह कोणत्या स्थितीत आहेत हे सांगता येत नाहीं. ज्यांची नांवें ठाऊक आहेत ते ग्रंथ वाचणें सोपें नाहीं. मराठी संतकवींचे चरित्रकार कांहीं उपयुक्त काव्यचर्चा करीत असतील अशा अपेक्षेनें जर आपण त्यांचे काव्यग्रंथ चाळूं लागलों तर मात्र निराशा होईल. चरित्रकारांचे संत म्हणून व्यक्ती- कडे लक्ष होतें, आणि अनेक चरित्रकार यांच्या ग्रंथाविषयीं कांहींच उल्लेख करीत नाहींत. किंब- हुना त्या व्यक्ती त्या चरित्रकारांस लेखक म्हणून ठाऊक नसून संत किंवा भक्त म्हणूनच ठाऊक होत्या असें दिसतें. संतकवींचें सिंहावलोकन कर णारा मोरोपंत हा कवि होता, व ज्याची काव्या- भिरुचि प्रतिष्ठित प्रकारची होती असा गृहस्थ होता पण त्याच्या सन्मणिमार्लेत देखील निश्चित काव्यमार्मिकता कोठेच दिसत नाहीं, सर्वांचीच स्तुति करावी, प्रत्येकास कसले तरी पदक बक्षीस द्यावे अशी सन्माणिभाषेत मोरोपंतांची वृत्ति दिसते. फरक एवढाच कीं हें करतांना त्याची वृत्ति शाबासकी देणाराची नसून आदर व्यक्त करणाराची होती. पुष्कळ प्रसंगी व्यक्तीवें जें गुणवर्णन होतें तें विशिष्ट यमक साधण्यासाठींच होत असल्यामुळे वैशिष्ठयशोधक पहाणी मोरोपंताकडून मुळींच झाली नाहीं हें सविस्तर पुढल्या प्रकरणांत दाखविलें जाईलच. प्रत्येक कवीवर दुसन्या कवीने काय लिहिलें आहे हें अगदी पद्धतशीर अभ्यासास, पांगारकरांच्या मराठी काव्याचें उत्तरकालीनांनी परीक्षण कसें केलें हें अगदी सविस्तर सांगावयाचे झाल्यास प्रत्येक कवीवर जें वाड्मय आहे त्याची पद्धतशीर सूचि उपलब्ध पाहिजे. तशा प्रकारची सूचि झाली नाहीं. व तिच्या अभावामुळे एकेक कवि घेऊन त्याच्यावर इतरांचें मत देणें बरेंच जड जाईल. काव्यपरीक्षणाच्या व चरित्रशोधनाच्या