पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९१) रेकडील दरवाज्यास कोतवाल दरबाजा असें ह्मणतात, ईशान्येकडील दरवाज्यास लालदेवडी असें नांव आहे. पुर्वेच्या बाजूस पुसाती नांवाचा दरवाजा आहे. खालून वर जाण्यास पूर्वी येथे शिडी लावावी लागत असे. आन्येयी दिशेस यशवंत दरवाजा आहे. येथील तटबंदीची उंची सुमारे ३० फूट आहे. दक्षिणेच्या बाजूस खेड दरवाजा आहे. पूर्वी किल्लयांतील लोकांस लागणारे सामानसुमान या रस्त्याने आंत आणीत असत; व पश्चिमेस शिवगंगा नांवाचा दरवाजा आहे. या दरवाज्याजवळ एक लहानशा ओढ्याचा उगम असून तेथे एका लिंगाची स्थापना केलेली आहे, व त्यावरूनच त्या दरवाज्याला शिवगंगा हे नांव दिले असावे. खेड दरवाजाच्या तोंडाशीच गणपतीचे व मारुतीचे अशी दोन देवालये आहेत. हल्ली त्यांच्या भिंती पडून गेल्या आहेत. पूर्वी येथे सातशें तबेले बांधलेले होते असे सांगतात. याच्याच कांहींसें पुढे गेले म्हणजे ४५ फूट लांब व ४४ फूट रुंद अशी एक इमारत लागते. तसेच एक परेश्वर नांवाचे देवालय लागते. याचे बांधकाम मोठे मजबूत असून त्याची लांबी ३८ फूट व रुंदी २० फूट आहे. या देवालयाला सालीना १५ रुपयांची सरकारांतून नेमणूक आहे. देवालयाच्या आवारांत दोन तळी आहेत. या किल्ल्याचे काम शिवाजीने सुरू केले होते व तें अपुरेच राहिले असें तेथील लोक सांगतात; हल्ली किल्लयांत ठिकठिकाणी कमावलेल्या चुन्याच्या ज्या मोठमोठ्या राशी पडलेल्या आहेत त्यावरून वरील गोष्टीस प्रमाण मिळते. किल्ल्यांतील जमीन खडकाळ व उंच सखल आहे. हल्ली आंत