पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९२) कांटेरी झाडेझुडपें वगैरे फार माजलेली आहेत. या किल्याचे संबंधानें इतिहासप्रसिद्ध अशी गोष्ट उपलब्ध नाही. १०पालगड.-खेडच्या वायव्येकडील सीमेवर जो एक उंच डोंगर आहे त्याच्या शिखरावर हा किल्ला बांधलेला आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे दीड एकर आहे. इ० स० १८६२ साली एकंदर किल्लयांची तपासणी झाली त्या वेळी हा किल्ला अगर्दी मोडकळीस आलेला होता, व आंत ९ जुन्या निरुपयोगी तोफा होत्या. हा किल्ला शिवाजीनें बांधला असे सांगतात. इ० स० १८१८ त कर्नल केनेडी याने हा किल्ला सर केला. हा किल्ला घेतांना इंग्लिशांस बरेच श्रम पडले. किल्लयांतील मराठी शिबंदीने हंग्लिशांवर एकसारखा तोफांचा भाडमार सुरू केला होता. परंतु अशा माराखाली इंग्लिशांचे लोक डोंगर चढून वर गेले व त्यांनी तो किल्ला घेतला. किल्लयाचे उत्तरेकडील उतरणीवर हिरवी झाडी असून तिला देवरान असें ह्मणतात. किल्ल्याचे पायथ्याशीच दापोली तालुक्यांतील पाली नांवाचा प्रसिद्ध गांव आहे. त्यावरूनच या किल्ल्याला पालगड असें नांव पडले असावे. ११रसाळगड.-ज्या डोंगरावर सुमारगड व महिपतगड हे किल्ले बांधलेले आहेत, त्याच डोंगरावर हा किल्ला बांधलेला आहे. याचे क्षेत्रफळ सुमारे ५ एकर आहे. सुमारगड व महिपतगड या किल्लयांहून याची उंची कमी आहे. किल्लयापासून तीन मैलांवर मांडव नांवाचे खेडे आहे, तेथून किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. उत्तरेच्या बाजूस हा किल्ला अरुंद असून तो दक्षिणेकडे रुंद होत गेलेला आहे व तेथे डोंगराचे दोन फांटे झालेले आहेत. एक