पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९०) सखल असून त्याच्या दक्षिणेस सुमारे चार मैलांवर आहे. त्याचे क्षेत्रफल सुमारे पाऊण एकर आहे. त्याच्या सभोवार तट असून त्याची उंची १५पासून २२फुटांपर्यंत आहे. किल्लयाच्या चार कोपऱ्यांवर चार मोर्चे उभारलेले आहेत. शिड्या लाविल्याशिवाय किल्ल्यांत जाता येत नाही. इ० स० १८६२त एकंदर किल्लयांची पहाणी झाली, त्या वेळी हा किल्ला मोडकळीस आलेला होता. आंत तोफा वगैरे कांही नव्हते. प ना 5.९ माहपतगड.- हा किल्ला खेडापासून सुमारे १२ मैलांवर हातलोटचा घांट व मकरंदगड यांच्यासमोर आहे. हा किल्ला सह्याद्रीशी समांतर जाणाऱ्या एका डोंगराच्या उंच शिखरावर बांधलेला असून महिपतगड, समारगड रसाळगड हे किल्लेही त्याच डोंगराच्या निरनिराळ्या शिखरांवर बांधलेले आहेत. किल्ल्यावर जाण्याचा रस्ता पोलादपूर नांवाच्या खेड्यावरून असून अतिशय अरुंद व बिकट आहे. किल्ल्याचा माथा साधारण सपाट असून त्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर आहे. या किल्लयाला एकसारखा वाटोळा तट घातलेला नाही. याच्या सभोवर बहुतेक तुटलेला कडा आहे. फक्त सहा ठिकाणी किल्लयावर जातां येण्यासारखा डोंगराचा भाग आहे. परंतु त्या ठिकाणी मजबूत तटबंदी करून भक्कम दरवाजे ठेविलेले आहेत . हल्ली दरवाजे वगैरे नाहीसे झाले आहेत व तटबंदीही पडून गेलेली आहे.किल्ल्याच्या सभोवार बेलदारवाडी नांवाचे खडें आहे. हे खेडे हा किल्ला बांधण्याकरितां शिवाजीने जे बेलदार लोक आणिले होते, त्यांना इनाम करून दिले होते, व त्यावरून त्याला तसें अन्वर्थक नांव पडले असावें. उत्त