पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८९) ल्ल्यावर एकंदर १९ शिपयांचा पहारा होता व आंत ६९ जुन्या निरुपयोगी तोफा पडलेल्या होत्या. किल्लयांत पाण्याचा पुरवठा कमी आहे. इ० स० १७९५ त इंग्लिशांनी सुवर्णदुर्ग काबीज केला, त्या वेळी हा किल्लाही त्यांचे हाती गेला. पुढे इ० स० १७५७ त इंग्लिशांनी तो पेशव्यांचे हवाली केला. इ० स० १८१७ त पेशव्यांची सत्ता नष्ट झाली त्या वेळी त्याचे स्वामित्व पुनः इंग्लिशांकडे आले. कनकदुर्ग व फत्तेगड या किल्ल्यांपेक्षा हा किल्ला अधिक मोठा व अधिक बळकट आहे, व अद्यापि तो नीट दुरुस्त आहे. आंत दोन बंगले आहेत. एकांत फिरस्ते युरोपियन लोक उतरतात, व दुसन्यांत कलेक्टर साहेब स्वारीकरितां बाहेर पडले झणजे उतरतात. आंत एका भिंतीत एक मारुतीची मूर्ति बसविलेली आहे, व दरवाज्याचे आंतले अंगास एक कासव काढलेले आहे. किल्लयाची दक्षिणबाजू समुद्राचे वर ५० फूट उंच आहे. ७ मंडणगड. हा किल्ला दापोली तालुक्यांत बाणकोटच्या पूर्वेस १२ मैलांवर मंडणगड नावाच्या एका उंच डोंगरावर बांधलेला आहे. दोन निरनिराळे किल्ले मिळून हा एक किल्ला झालेला आहे व त्याला तिहेरी तटबंदी आहे, व त्याचे क्षेत्रफळ सुमारे ८ एकर आहे. खेड तालुका. -:

--

८ सुमारगड.- हा किल्ला खेड तालुक्यांत महिपतगड ज्या डोंगरावर बांधलेला आहे त्याच डोंगराच्या एका फांट्यावर बांधलेला आहे. हा किल्ला महिपतगडापेक्षा