पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रदेश घेतला, परंतु सुवर्णदुर्गाचे शेजारी आसन्याची अशी त्याला जागा नव्हती. तेव्हां त्याने हे दोन किल्ले बांधले, व इ० स० १७२७ पर्यंत ते त्याच्या ताब्यात होते. त्या कालांत त्या प्रांताच्या संरक्षणाकरितां खैरातखान याने जे मुभेदार नेमिले होते त्यांची नांवेंः-धर्मराव सांवत, हिबाव दळवी,सिद्दी मसाऊदखान, सिद्दी मसाऊद,सिद्दी सयद किंवा अलमगर,सिद्दी सयद वदले व सिद्दी याकूब. वरील दोन्ही वृत्तांत ताडून पाहतां दुसरा वृत्तांत ज्यास्त विश्वासमीय आहे असे सहज दिसून येईल. इ. स.१७५९ त इंग्लिशांचा सरदार कमोदार जेम्स याने सुवर्णदुर्ग काबीज केला त्याच वेळी वरील दोन्ही किल्लेही त्याने सर केले, व ते पेशव्यांचे हवाली केले. कनकदुर्ग हा किल्ला एका उंचवट्याच्या प्रदेशावर बांधलेला असून त्याच्या तीन बाजूंस समुद्र आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे अर्धा एकर आहे. इ० स० १८६२ त तो अगदी मोडकळीस आलेला होता. इ० स० १८७९ त त्याचा सर्वभाग जमीनदोस्त झालेला होता. फक्त दोन टोकांस दोन सज्जे मात्र शिलक राहिले होते. आंत पाण्याची एकंदर ९ टांकी आहेत, व त्यांच्यांत पाणीही विपुल आहे. फत्तेगडाची तर हल्ली अशी स्थिति झाली आहे की, पूर्वी तेथे किल्ला होता . किंवा नव्हता याची शंकाच उत्पन्न होऊ लागली आहे. ६ गोवा किल्ला. हा किल्ला एका लहानशा टेकडीवर बांधलेला असून त्याच्या उत्तर व पश्चिम या दोन बाजूंस समुद्र आहे, व त्याचे क्षेत्रफळ दोन एकर आहे. इ० स० १८६२ त एकंदर किल्लयांची जी पहाणी झाली त्या वेळी हा किल्ला नीट दुरुस्त होता. त्या वेळी या कि