पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८७) च्या सुमारास सातारच्या शाहूमहाराजांनी हे दोन किल्ले बांधले, व ते बांधण्यात त्यांचा असा उद्देश होता की, सुवर्णदुर्ग आंग्र्याचे ताब्यात होता तेव्हां त्याच्या शेजारी आपण हे दोन किल्ले बांधले म्हणजे तेणेकरून आंग्र्यावर आपला बराच दाब बसून त्याला विशेष हालचाल करतां येणार नाही. परंतु पुढे लवकरच ते त्यांनी आंग्र्याचे स्वाधीन केले. परंतु हा वृत्तांत खरा असावा असे दिसत नाही. कारण इ. स. १७०८त शाहूमहाराजांचे पाय साताऱ्यास लागले. त्या वेळी ते व ताराबाई यांच्यामध्ये फार जोराने भांडणे सुरू होती, व ती इ. स. १८११ पर्यंत एकसारखी सुरू होती. या वेळी कोंकणपट्टीचा बहुतेक भाग कान्होजी आंग्र्याचे ताब्यात होता व तो ताराबाईच्या पक्षाकडे प्रथमतः होता. इ. स. १८१२ त तर त्याने राजमाची वगैरे किल्ले घेऊन थेट साता-यावर स्वारी करण्याचा घाट घातला होता. सारांश, त्या वेळी कान्होजी फारच प्रबळ होता, व शाहूमहाराजांची सत्ता मुळीच बसली नव्हती. अशा वेळी त्यांनी कान्होजीस दाबांत ठेवण्याकरितां वरील दोन किल्ले बांधले, व कान्होजीसारख्या सरदाराने ते बांधू दिले ही गोष्ट अगदी असंभवनीय आहे. दुसऱ्या एका वृत्तांतांत असे दिले आहे की, इ० स० १७०० च्या सुमारास जंजिऱ्याचा हबशी खैरातखान याने हे दोन किल्ले बांधले. हे बांधण्याचे कारण असे झाले की, इ. स. १७०० च्या पूर्वी खैरातखान याने सुवर्णदुगोवर स्वारी केली होती, परंतु तीत त्याला यश मिळाले नाही. तथापि त्याने त्याच्या लगत्याचा किनाऱ्यावरील