पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८९ ) किनाऱ्यावरील तीन किल्ले घेण्याच्या कामांत गुंतलेला होता. तारीख २ एप्रिल रोजी कमोदर जेम्स याने सुवर्णदुर्गावर आपला तोफखाना सुरू केला. परंतु त्या बाजूस जबरदस्त खडक असल्यामुळे त्याचा उपयोग झाला नाही. तेव्हां तो किल्ल्याच्या ईशान्य दिशेकडे आपले आरमार घेऊन गेला, व तेथून त्याने किल्लयांत तोफखान्यावर जी शिबंदी होती, तीवर आपला गोळीबार सुरू केला. गोळ्यांचा एकसारखा वर्षाव होत असल्यामुळे व त्याच वेळी किल्लयांतील दारूगोळ्यास आग लागून तो पेटल्यामुळे आंग्र्याचे लोक सुवर्णदुर्ग सोडून गोवा किल्लयावर पळून गेले. थोड्याच वेळांत सुवर्णदुर्गचा किल्लेदार काही निवडक लोक बरोबर घेऊन परत किल्लयांत येऊन दाखल झाला. आपण आजचे काम उद्यांवर टा. किलें तर रात्रीस कदाचित् दाभोळेहून किल्लयांतील लोकांस मदत येईल असें जेम्स साहेबास वाटल्यावरून त्याने लगेच आपले निमे लोक किनाऱ्यावर पाठवून दिले. त्यांन एकदम लगट करून किल्ल्याचा चोरदरवाजा कु-हाडी घालून फोडून टाकिला व आंतील लोकांवर हल्ला करून किल्ला सर केला. नंतर तारीख ११ रोजी कमोदर जेम्स याने कराराप्रमाणे तो किल्ला पेशव्यांच्या स्वाधीन केला. इ० स० १८०२ त दुसरा बाजीराव पेशवा यशवंतराव होळकराच्या भीतीने इतस्ततः पलायन करूं लागला तेव्हां कांहीं कालपावेतो त्याचा वास या किल्ल्यावर होता. परंतु त्याला येथेही स्वतःचे संरक्षण करतां येईना; तेव्हां त्याने आपला कुटुंबवर्ग येथेच टाकून दिला व खतः वसईस इंलिशांचे आश्रयास गेला. in