पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मार्च इ०स० १८५५ रोजी कमोदर जेम्स हा आपले आरमार घेऊन बाहेर पडला. आंग्र्याच्या किल्लयांवर हल्ला न करतां समुद्राचे बाजूने त्यांस वेढा द्यावा, असा त्यास मुंबई सरकाराचा हुकूम झाला होता. नंतर तीन दिवसांनी त्याला पेशव्यांचे आरमार येऊन पोहोचले. या आरमारावर पेशव्यांचे एकंदर दहाहजार स्वार होते. नंतर आंग्र्याचे आरमार सुवर्णदुर्ग येथे आहे अशी बातमी समजली. तेव्हां कमोदर जेम्स याने रात्रीच्या रात्रीस हर्णैस जाऊन त्या बंदराची नाकेबंदी करण्याचा निश्चय केला. परंतु नेमलेल्या वेळी पेशव्यांचे आरमार येऊन पोहोंचले नाही. प्रातःकाळी आंग्र्याचे आरमाराने इंग्लिश व पेशवे यांचे आरमार पहातांच ते पळू लागले. इंग्लिशांचे आरमार व मराठ्यांचे आरमार त्याचा पाठलाग करूं लागले. परंतु त्या वेळी वारा अगदी पडलेला होता. आंग्र्याच्या आरमारावरील लोकांनी गलबतें हलंकी व्हावी म्हणून त्यांतले निरीम काढून टाकले व सर्व शिडे उभारली. ते लोक इतकेंही करून राहिले नाहीत. ज्यास्त वारा सांपडून गलबतें जोराने चालावी म्हणून त्यांनी आपली धोतरें व पागोटी हीही वारा अडविण्याकरितां आपल्या गलबतांस लाविली होती. इंग्लि. श व मराठे यांच्या आरमाराने संध्याकाळपर्यंत आंग्र्याच्या आरमाराचा पाठलाग केला. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. शेवटी अस्तमानसमयीं कमोदर जेम्सनें आंग्र्याचा पाठलाग सोडून दिला. नंतर सुवर्णदुर्ग येथे येऊन त्याने वरवा केला. त्या वेळी पेशव्यांचा सरदार रामाजीपंत हा