पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोष्ट उपलब्ध नाही. आंत युरोपियन लोकांच्या बंगल्यांचे पाये, बागा, व युरोपियन लोकांची थडगी यांच्या बऱ्याच खुणा आहेत. लाल २ हर्णै. हा गांव आंजल्यौंच्या दक्षिणेस २ मैलांवर व दाभोळच्या उत्तरेस १५ मैलांवर समुद्रकांठी आहे. हर्णे हे एक प्रसिद्ध बंदर आहे. या गांवाखाली एकंदर ४ किल्ले मोडतात. त्यांची नांवें --सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग फत्तेगड आणि गावा. यांपैकी सुवर्णदुर्ग हा किल्ला जंजिरा (पाण्यांत ) आहे, व तो फार प्रसिद्ध आहे. बाकीचे तीन जमिनीवर असून विशेष प्रसिद्ध नाहीत. त्यांचे वर्णन खाली दिल्याप्रमाणे आहेः- ज लवा ३ सुवर्णदुर्ग-हा किल्ला हणच्या काहीसा उत्तरेस किनान्यापासून सुमारे पाव मैलावर समुद्रांत एका खडकावर बांधलेला आहे. या किल्लयाचा तट अतिशय उंच असून फार मजबूत आहे.रत्नागिरी जिल्ह्यांतील किल्लयांमध्य हा किल्ला फार भव्य दिसतो. काही ठिकाणी निवळ खडक फोडून तटाचा भाग तयार केलेला आहे, व काही ठिकाणी १२ फुटांपर्यंत चौरस चिरे लावून तो बांधलेला आहे. किल्लयाच्या तटास पुष्कळ बुरूज असून एक दरवाजा आहे. ह्या तटाच्या सभोवार फक्त ओहोटीच्या वेळी फिरतां येते. ह्या तटावर हल्ली अतिशय झाडझुडूप वाढलेले आहे. किल्लयांत पुष्कळ विहिरी आहेत. त्यांपैकी एका विहिरीस पायया बांधलेल्या आहेत. ह्या विहिरीतून पाणी विपुल आहे. दरवाज्याला लागूनच एका दगडावर कूमाची प्रतिमा काढलेली आहे, व त्याच्या समोर डावे बाजूस भिंतीवर एक मारुतीची मूर्ति काढिलेली आहे. दरवाज्याच्या