पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८१) वर आहे. ह्या डोंगरावर झाडेझुडपें बरीच आहेत. बाणकोटच्या किल्ल्याचा आकार चौकोनी आहे. त्याला जमिनीकडच्या बाजूस खंदक खोदलेला आहे. शिवाय खाडीच्या अंगास मुख्य किल्लयाचे बाहेर वर व खाली असे दोन बुरूज बांधलेले आहेत, व मुख्य किल्लयापासून त्यांच्यापर्यंत एक मजबूत भिंत घातलेली आहे. खालचा किंवा पाणबुरूज हा हबशीने बांधला, व वरचा आंग्रयांनी बांधलेला आहे. खालच्या बुरुजापासून ३०० पायऱ्या चढून गेले म्हणजे वरचा बुरूज लागतो, व तेथून ७०० पायऱ्या चढून वर गेले झणजे किल्लयांत प्रवेश होतो. हे दोन्ही बुरूज हल्ली-मोडकळीस आलेले आहेत; खालून वर किल्लयांत जाण्याचा रस्ता फरसबंदी असून तो अद्यापि दुरुस्त आहे. पूर्वी हा किल्ला विजापुरकरांचे ताब्यांत होता. पुढे इ० स०.१५४८ त पोर्तुगीज लोकांनी हा किल्ला घेतला व बाणकोट गांव जाळून टाकिला. नंतर त्याचे स्वामित्व मराठ्यांकडे आले. इ० स० १७६५ त आंग्र्यांचे पारिपत्य करण्याकरितां पेशवे व इंग्लिश एक झाले, त्यावेळी कमोडर जेम्स याने हा किल्ला घेतला. परंतु पुढे इंग्लिशांनी मराठ्यांस तो किल्ला परत दिला. पुढे त्याच वर्षाच्या आक्टोबर महिन्यांत तो किल्ला व आणखी नऊ गांव पेशव्यांनी इंग्लिशांस दिले. त्या वेळी इंग्लिशांनी या किल्ल्याचे पूर्वीचे हिंमतगड हे नाव बदलून त्याचे फोर्ट व्हिक्टोरिया असें नांव ठेविलें. व्यापाराचे कामी आपणांस या किल्ल्याचा फार उपयोग होईल, असें इंग्लिशाप्त वाटले होते. परंतु तेथे इंग्लिशांचा व्यापार बरोबर रीतीने जुळेना. या किल्ल्याचे संबंधाने विशेष अशी काहीच