पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८०) नीट दुरस्ती केली. सातारचे राजांचे मागें पेशव्यांचे हाती राज्यसत्ता आली, त्या वेळी ज्याप्रमाणे त्यांनी उत्तर कोकणांतील किल्ल्यांच्या दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिलें नाही,त्याचप्रमाणे दक्षिण-कोकणांतील किंवा रत्नागिरी जिल्ह्यांतील किल्ल्यांच्या दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिले नाही. सुमारे वीस वर्षांत या किल्लयांकडे पेशव्यांनी एक दिवसाचे श्रम किंवा एक रुपयाही खर्च केला नाही, असें नैन साहेबाने आपल्या कोकणच्या इतिहासांत लिहिलेले आहे. इ० स० १८१८त मराठ्यांचे राज्य लयास गेले त्या वेळी इंग्लिशांना हे किल्ले घेण्यास विशेष श्रस पडले नाहीत. बाणकोट, हर्णै, विजयदुर्ग, वगैरे किल्ल्यांची इंग्लिशांनी मधून मधून दुरुस्ती केली. बाकीचे किल्लयांस त्यांनी हातही लावला नाही. हल्ली हे बहुतेक किल्ले काला तिक्षेपामुळे,व त्यांच्या तटांवरून झाडे झुडपें वाढून त्यांच्या मुळ्या आंत गेल्यामुळे ढांसळून पडले आहेत. फक्त रत्नागिरी जिल्ह्यांत पूर्वी ३६५ किल्ले होते, परंतु हल्ली फक्त ४० किल्यांची माहिती मिळते. त्यांचे तालुकेनिहाय वर्णन येणेप्रमाणेः दापाला तालुका न दापोली तालुका. -::१ बाणकोट किंवा फोर्ट व्हिक्टोरिया.—याला मराठ्यांचे वेळी हिंमतगङ असें म्हणत असत. हा किल्ला सावित्री नदीच्या किंवा बाणकोटच्या खाडीच्या मुखाशी दक्षिणतीरावर एका उंच डोंगराच्या माथ्यावर बांधलेला आहे. या डोंगराचा रंग कांहीसा तांबूस आहे. हा किल्ला मुंबईच्या काहीसा आमेयीस ७३ मैलां