पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७९) वर बांधलेले असून कोणचीना कोणची तरी नदी किंवा खाडी त्यांचे माऱ्यांत असावयाचीच. सह्याद्रीतील सर्व किल्ले कोकणच्या बाजूने पुढे झुकलेल्या शिखगंवर बांधलेले आहेत. बहुतेक किल्ल्यांचे बांधकाम एकाच त-हेचे आहे; म्हणजे प्रथमतः एखाद्या टेकडीच्या माथ्यासभोवार एक बळकट भिंत घातलेली असावयाची, तिला पुष्कळ बुरूज असावयाचे, जिकडून शत्रु येण्याची भीति त्या बाजूस एक मेढेकोट असून त्याच्या दोन्ही बाजूस दोन मजबूत भिंती घालून त्या मुख्य किल्ल्यापर्यंत बांधलेल्या असावयाच्या, दरवाजा बहुतकरून एक असावयाचा, परंतु त्याचे बांधकाम मात्र अतिशय मजबूत असावयाचे. काही ठिकाणी जागा सोयीकर मिळाली तर एक आंतला व एक बाहेरला असे दोन दरवाजे असावयाचे. बाहेरच्या दरवाज्याच्या दोन बाजूंस दोन भक्कम बुरूज असावयाचे; बाहेरचा व आंतला या दोन दरवाज्यांमध्ये साधारण अंतर बरेंच असावयाचे, व त्या दोहोंच्या मध्यंतरी दोन बाजूंस भक्कम भिंती असून मधील वाट नागमोडी असावयाची. अशा प्रकारच्या व्यवस्थेमुळे शत्रूला किल्लयांत सहसा प्रवेश करतां येत नसे. मुख्य किल्ल्याच्या आंत बहुघा बालेकिल्ला असावयाचाच. - या किल्ल्यांपैकी काही किल्ले कधी बांधले असावे, याचा खातरीने निर्णय करितां येत नाही. मंडणागड वगैर किल्ले रित्रस्तीशकाचे पूर्वीचे असावे असा तर्क होतो. काही किल्ले पन्हाळ्याच्या भोजराजाने बांधले असे सांगतात, व काही विजापूरच्या बादशाहांनी (१५००-१६६०) बांधले असें सांगतात. सतराव्या शतकांत शिवाजीने या सर्व किल्ल्यांची