पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७८). भाग आहे. पूर्वेस हातलोट घाटापासून नरदुवा घाटापर्यंत सह्याद्रीची ओळ पसरली आहे. या ओळी पलीकडे सातारा व कोल्हापूर हे प्रांत आहेत, व रत्नागिरी जिल्ह्यापैकी संगमेश्वर तालुक्यांतील गोठणें नांवाचे खेडे आहे. त्याची दक्षिणसीमा नागमोडी आहे. ह्मणजे त्याच्या आग्नेयी दिशेस सावंतवाडी संस्थान आहे, व थेट दक्षिणेस तेरेखोलची खाडी आहे. तिच्या पलीकडे गोवें प्रांत लागतो; व पश्चिमेस बाणकोटच्या खाडीपासून तो थेट तेरेखोलच्या खाडीपर्यंत आरबी समुद्र आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत एकंदर १६०मैल लांबीचा समुद्रकिनारा मोडतो. रत्नागिरी जिल्ह्याचे नऊ तालुके आहेतः-दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर,रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण, व वेंगुर्ले. या जिल्ह्यांतील किल्यांचे साधारण वर्णनः-रत्नागिरी जिल्ह्यांतील काही किल्ले समुद्रकिनाऱ्यावर आहेत व कांहीं अंतःप्रदेशांत आहेत. किनाऱ्यावर जे किल्ले आहेत, त्यांचे दोन प्रकार आहेत. काही जंजिरे किंवा पाण्यांत बांधलेले आहेत, व कांहीं समुद्रकिनाऱ्याला लागून अस. णाऱ्या डोंगरांच्या शिखरांवर बांधलेले आहेत. या किल्लयांत बाणकोट, अंजनवेल किंवा गोपालगड, गोवळकोट, जयगड, रत्नागिरी, देवगड रामगड, रेडी वगैरे किल्ले मुख्य आहेत. अंतःप्रदेशांत जे किल्ले बांधलेले आहेत,. ते एखादी चांगली सोयीकर टेकडी किंवा सपाट जागा पाहून बांधलेले आहेत. सपाट प्रदेशांतील किल्ले बहुतकरून एखाद्या डोंगराच्या उंच शिग्वरा FFE