पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७७.) बांधला हे समजत नाही. त्या वेळी “ कल्लायणचा किल्ला फार उत्तम असून वर १५०० लोकांचा पहारा आहे " असें वर्णन केलेले आहे. तसेच ते अहमदनगरच्या राजांच्या अमलाखाली असून त्या राज्याच्या एका प्रांताचें मुख्य शहर होतें. इ० स० १६३६ त तें विजापुरकरांचे ताब्यांत गेलें, व भिवडीपासून नागोठण्यापर्यंतच्या प्रांताचें तें मुख्य शहर होतें. इ० स० १६४८ त शिवाजीचा सरदार आवाजी सोनदेव याने कल्ल्याणवर स्वारी करून ते घेतले व तेथील सुभेदारास कैद केलें. इ० स० १६६० त मोंगलांनी ते घेतले, परंतु इ० स० १६६२ त शिवाजीने ते परत घेतले. इ० स० १६७४ त शिवाजीने इंग्लिशांस कल्लयाण येथे वखार घालण्यास परवानगी दिली. रत्नागिरी जिल्हा - ०: रत्नागिरी हा जिल्हा उत्तर अक्षांश १५° ४० व १८६ व पूर्व रेखांश ७३५ व ७३° ५५' यांच्यामध्ये आहे. याचे क्षेत्रफळ ३५२२ चौरसमैल, लोकसंख्या ११०५९२६ व उत्पन्न सुमारे १०१३४२० रुपये आहे. सावित्री नदीच्या उत्तरेस बागमांडले व कोलमांडले अशी दोन खेडी रत्नागिरी जिल्ह्यांत मोडतात. ती सोडून रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेस समुद्रकिनाऱ्यापासून तो थेट महाप्रलपर्यंत ह्मणजे सुमारे २४मैल सावित्री नदी आहे. तिच्या पलीकडे जंजिरा संस्थान लागते. ईशान्य दिशेस महाप्रलपासून हातलोट घाटापर्यंत कुलाबा जिल्ह्याचा