पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७६) णच्या बाजूस कस्टमची कचेरी आहे, व एक बुजत आलेली विहीर आहे. किल्लयाच्या तटाचा अवशेष भाग म्हटला म्हणजे फक्त दरवाजा कायतो दृष्टीस पडतो. किल्लयाचा खंदक २० फूट खोल व ३३ फूट रुंद आहे किन काली कल्लयाणच्या किल्ल्याच्या संबंधाने घडून आलेल्या ऐतिहासिक गोष्टी म्हणजे कल्लयाणचा इतिहास देण्यासारखेच आहे. तो इतिहास येणेप्रमाणे: कान्हेरी येथील निरनिराळ्या ९ लेखांत कल्याणचें नांव लिहिलेले आहे. त्यावरून इ०सनाच्या पहिल्या शतकापासून कल्लयाण शहर व्यापारासंबंधाने प्रसिद्ध होते. पुढे व्यापारासंबंधानें कल्लयाणचें नांव मागे पडून ठाण्याचे नांव पुढे आले. दहा, अकरा व बारा या शतकांत अरब लोक हिंदुस्तानावर स्वाऱ्या करीतच होते. तेथपर्यंत मुसलमान लोक कल्याणास आले नव्हते. चवदाव्या शतकाच्या आरंभी ते लोक कल्लयाणास आले, व त्यांनी त्या शहराला इसलामाबाद असें नांव दिले. पंधराव्या शतकांत कल्लयाणच्या संबंधाने कोठे उल्लेख नाही. परंतु त्या वेळी तेथें बहामणी राजांचा अमल होता, व बहामणी राज्याचे तुकडे झाल्यावर तें शहर अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचे अमलाखाली गेलें. इ० स० १५३६ त पोर्तुगीज लोकांनी तें मुसलमानांपासून घेतले. त्यांनी त्याचा बंदोबस्त वगैरे कांहीएक केले नाही, व ते तसेच निघून गेले. इ० स० १५७०त त्यांनी कल्लयाणावर पुनः स्वारी केली, व आसपासच्या वाड्या जाळून तेथून पुष्कळ लूट नेली. या वेळी कुल्ल्याण येथे किल्ला बांधलेला होता. परंतु तो कोणी