पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे. या मशिदीपासून ३० याडौंवर एक खोल विहीर आहे. लाती . मराठ्यांचे कारकीर्दीत गणेश दरवाज्याचे दक्षिणेस १६० फुटांवर त्या वेळचा पेशव्यांचा कल्लयाणचा सुभेदार रामाजी महादेव बिवलकर याने एक नवीन दरवाजा पाडला, व किल्ल्यांत मशिदीचे मागचे अंगास दुर्गा देवीचे एक लहानसें देवालय बांधले. या देवीच्या नावावरून ह्या किल्याला पुढे दुर्गादेवीचा किल्ला असें ह्मणूं लागले. तसेंच आंतील मशिदीत मराठ्यांनी रामाची मूर्ति बंसविली, व तेव्हांपासून तिला रामजीचे देऊळ असें नांव पडले. इ० स० १८१८ त कल्लयाणची तटबंदी नीट दुरस्त होती. किल्ल्याची लांबी २२० फूट व रुंदीही जवळजवळ तितकीच होती, व तटाची उंची २२ फूट व रुंदी सुमारे ११ फूट होती. त्याचा दरवाजा बळकट होता, व आंत २ उत्तम इमारती, व एक देवालय होतें.. इंग्लिशांचे कारकीर्दीत इ० स० १८६५ त कल्लयाण शहराच्या पूर्व व दक्षिण या बाजूकडील तट इंग्लिशांनी पाडून टाकला, व तिकडून सड़क बांधिली. तसेंच त्याचा पश्चिमेकडील तट पाडून त्याचे दगड कल्लयाण व ठाणे येथे पुलांच्या कमानी वगैरे बांधण्याकरतां नेले, व किल्लयाच्या पश्चिमबाजूस कस्टम खात्याच्या इन्स्पेक्टराकरतां एक इमारत बांधिली. हल्ली किल्लयाच्या वायव्येकडील उंचवट्यावर फक्त इदगा व देवालय एवढी मात्र शिलक आहेत. परंतु त्या देवालयांतील मूर्ति इ० स० १८७६ त कोणी चोरून नेली, तेव्हांपासून ते देवालयही ओसाड पडलेले आहे.. दक्षि-.