पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व जवळजवळ तितकीच रुंद अशी अर्धवर्तुलाकृति भिंत बां. धली. किल्लयाच्या वायव्य कोपऱ्यास जुन्या तटाच्यावर सुमारे ३० फूट उंचीच्या धक्क्यावर एक मुसलमानाचे थडगें, एक नमाज पढावहाची जागा व दुसरी कांही घरे होती. 12 शहराचा तट एकंदर २१२३ यार्ड. लांब होता. त्याच्या ११ बुरुजांपैकी ४ बुरूज फार मोठे होते. या चोहोंपैकी एक ईशान्य कोपऱ्यावर होता, दुसरा पूर्वेकडील बाजूच्या मध्यावर होता, तिसरा आग्नेयी कोपऱ्यावर होता, व चवथा जेथें गलबतें लागतात तेथें होता. चार दरवाज्यांपैकी अधार दरवाजा हा उत्तरेकडील तटाच्या मध्यभागी होता. ह्या बाजूस अधार नांवाचे खडे आहे, त्यावरून त्याला अधार दरवाजा असें नांव पडले होते. दुसरा गणेश दरवाजा हा पूर्वेकडील तटाच्या मध्यावर होता, तिसरा पनवेल दरवाजा हा दक्षिणेकडील तटाच्या मध्यावर होता, व चवथा बंदर दरवाजा हा पश्चिमेकडील तटाच्या मध्यावर होता. - किल्ला व शहर यांच्यामध्ये खंदक होता. किल्लयाचा दरवाजा किल्ल्याच्या उत्तर टोंकास होता. त्याला दिल्लीदरवाजा असे म्हणत असत. किल्लयांत जाण्याला शहराच्या उत्तरेकडील तटाकडून वाट होती. किल्लयाचे आंतील जागा खोलगट होती, व एक उथळ असें लहानसे तळे होते. किल्ल्याच्या वायव्येकडील कोपन्यास एक ३० फूट उंचीचा उंचवटयाचा प्रदेश आहे. ह्या जागेवर ६४ फूट लांब, १३ फूट उंच, व सात फूट जाड असें एक आवार आहे. त्याला इदगा असे म्हणतात. तसेच त्याच्या पूर्व बाजूस एक मशीद आहे. तिची लांबी २२ फूट व रुंदी २२ फूट