पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांनी आवडीस धरून आणिलें. तसेंच चोरीचा बराच माल त्या ठिकाणी पोलिसास मिळला. ज्या कडयावरून हरीला ढकलून दिले ह्मणून त्याने सांगितले त्या ठिकाणी जातां, लोकांना त्या बिचाऱ्याचा सांगाडा मात्र सांपडला. इ० स० १८६२ त एकंदर किल्लयांची जी पाहणी झाली, त्या वेळी " हा किल्ला हल्ली मोडून गेला आहे " असा या किल्लयावर शेरा दिलेला आहे. वर सांगिलेल्या गोष्टीशिवाय दुसरी एखादी ऐतिहासिक गोष्ट या किल्लयाचे संबंधाने उपलब्ध नाही. कल्ल्याण तालुका. -:*:४० कल्याणचा किल्ला:-कल्लयाण हे शहर कल्लयाण तालुक्याचे मुख्य ठाणे आहे. ते मुंबईच्या ईशान्येस ३३ मैलांवर कल्लयाणच्या खाडीच्या काठी आहे. पुण्याहून जाणारी आगगाडी व नाशिकाहून येणारी आगगाडी या कल्लयाण येथे येऊन मिळतात. शहाजहान बादशाहाचे कारकीर्दीत (इ० स० १६२८-१६५८) त्याचा सरदार नबाब मोहतवारखान याने कल्लयाणच्या सभोवार दगडी तट बांधण्याचे काम सुरू केलें. तो तट पुढे औरंगजेब बादशाहाचे कारकीर्दीत इ० स० १६९४ त पुरा झाला. त्या तटाल एकंदर ११ बुरूज व ४ दरवाजे होते, व त्याचे क्षेत्रफळ ७० एकर होते. या तटाच्या ईशान्येस कोपऱ्यावर खाडीच्या किनाऱ्यास एका उंचवट्याच्या जागी एक दुसरा किल्ला बांधलेला होता. प्रथमतः हा किल्ला शहरापासून अलग होता. नंतर त्या दोहोंच्यामध्ये एक २०० फूट लांब