पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७२) धान्याची कोठी, व शिपायांकरितां बांधलेली इमारत व दुसरी लहान लहान घरे होती, व ती नीट दुरुस्त होती. इ० स० १८६७ च्या सुमारास भिवाजी नाईक नांवाचा एक पुंड या किल्लयांतील एका गुहेत राहूं लागला. या अट्टल चोराने पोलीस लोकांस अगदी भंडावून सोडले होते. किल्लयाचे पायथ्याशी नांदगांव म्हणून एक खेडे आहे, तेथच्या एका न्हाव्याच्या बायकोस त्याने पळवून नेले होते. या बाईचें नांव आवडी असें होतें, व तो तिच्यासह वर सांगितलेल्या गुहेत राहत असे. तो तेथें बरेच महिने होता. तथापि पोलिसास त्याची दाद लागली नाही. त्याने हरी या नावाचा एक मनुष्य आपल्या नौकरीस ठेविला होता; व तो बाहेर पडला म्हणजे आवडीच संरक्षण करण्याकरितां तो त्याला नेहमी तिच्याजवळ ठेवीत असे. पुढे काही कारणावरून हरीच्या वर्तणुकीच्या संबंधाने त्याला मत्सर उत्पन्न होऊन त्याने त्या गरीब बिचाऱ्या मनुष्याला किल्लयाच्या कडयावरून खाली ढकलून दिले. पुढे तो म्हासें नांवाच्या शेजारच्या खेड्यांत लग्नाकीरतां गेला होता, तेथे मागचा पुढचा विचार न पाहतां तो यथेच्छ दारू प्याला व त्या स्थितीत बेशुद्ध पडला. त्या गांवच्या लोकांनाही त्याने फार त्रास दिला होता. त्यामुळे त्यांनी त्याला लगेच कैद केले, व ते त्याला मुरबाड येथे घेऊन आले. तो मुरबाडास आला त्या वेळी तो अर्धमेला झालेलाच होता, व पुढे लौकरच तो मरण पावला. मरणाचे पूर्वी त्याने आपला सर्व वृत्तांत सांगितला; त्यावरून पोलीसचे लोक सिदगडावर गेले, व