पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकारची हत्यारे गोळा करून शिडीच्या खाली ज्या पायऱ्या होत्या त्या मी पाडून टाकल्या. ह्या पायऱ्या एका ४० फूट उंचीच्या खडकांत खोदलेल्या होत्या, व त्या अगदी उभ्या होत्या. " ह्या किल्लयाच्या दोन्ही बाजूंस खोल दन्या आहेत व याच्या आसपासचा प्रदेश अगदी मोकळा आहे. या किलयाच्या पिछाडीस सह्याद्रचिी जी अगम्य किंवा दुर्गम शिखरे आहेत त्यांवर येथून जातां येत असे. टेकडीच्या माथ्यावर एक तळे आहे, व आंत राहण्याकरतां ह्मणून खडकांत खोदलेल्या काही कोठड्या आहेत. खालच्या सपाट प्रदेशांत कांहीं घरे होती व तेथे शिबंदी राहत असे. तसेंच तेथे दोन पाण्याचे झरे होते, त्यांचे पाणी शिदोस पुरत असे. या किल्लयाची अवघड चढण व त्याच्या माथ्यावरील प्रदेश यांची स्थिति लक्ष्यांत आणिली म्हणजे हा किल्ला कधीच सर करतां यावयाचा नाही असे दिसून येईल. इ० स० १८६२ त याची सर्वत्र पडापड झालेली होती. महत्त्वाची अशी ऐतिहासिक गोष्ट येथे घडून आल्याचे आढळून येत नाही. ३७ गोरखगड:-हा किल्ला मुरबाडच्या आग्नेयीस सुमारे १२ मैलांवर, व सिदगडापासून सुमारे २ मैलांवर खोपवली घांटाच्या पायथ्याशी सह्याद्रीच्या एका बाहेर झुकलेल्या ४०० फूट उंचीच्या खडकावर बांधलेला आहे. ह्या किल्लयाचें क्यापटन डिकिनसन याने इ० स० १८१८ त जें वर्णन केले आहे, त्यावरून पूर्वी या किल्ल्याचे वरचा किल्ला व खालचा किल्ला असे दोन भाग होते असे दिसते. -टेंकडे।ण पायथ्यापासून वर जाऊ लागले झणजे पहिला