पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

णतात. हा किल्ला मुरबाड तालुक्यांत मुरबाडच्या पूर्वस २.२ मैलांवर मोरोशी नावाच्या खेड्या शेजारी नाणे घाटाच्या काहींसा ईशान्येश सह्याद्रीच्या एका ६०० फूट उंचीच्या फांट्यावर बांधलेला आहे. किल्ल्याचा पायथा फारच अरुंद आहे, व त्याची १०० फूट चढण फार अवघड आहे. चढावाच्या ४० पायऱ्या सरळ उंच होत्या व त्या दगड खोदून तयार केलेल्या होत्या. ह्या पायन्यांवर २७ फुट उंचीची एक भक्कम लांकडी शिडी लाविलेली होती. ही शिडी वरच्या अंगास लोखंडी सांखळदंडानें बांधलेली होती. या शिडीच्या माथ्यावर आले म्हणजे तिच्या वरचा रस्ता तळाजवळच्या पायन्यांप्रमाणेच खडक फोडून तयार केलेला होता, व मध्यंतरी एक अवघड व भयंकर चोरदरवाजा होता. वर सांगितलेली लांकडी शिडी इ० स०१८१८ त क्यापटन डिकिनसन याने मोडून टाकिली. त्या वेळी त्या साहेबाने ता० ६ जानेवारी इ. स. १८ १८ रोजी एका इंजीनियरास पत्र लिहिले त्यांत तो असें लिहितो की " मी बैरामगड येथे असतांपेशवा (वाजीराव) बऱ्याच फौजेसह जवळपास येऊन पोहोचला आहे अशी बातमी मला समजली. किल्ल्याला वेढा देण्याकरितां जे लोक पाठविलेले होते ते किल्ल्याच्या पायथ्याशी होते, त्यांना वर जाता येईना. तसेंच बाजीरावाचे बेत काय होते त्यांचाही अजमास लागेना, तेव्हां किल्लयावर जाण्याकरितां ३० फूट उंचीची जी भक्कम शिडी होती ती मोडून टाकावी असे मला वाटले, व त्याप्रमाणे मी केले. हा किल्ला एका निमुळत्या होत गेलेल्या उंच शिखरावर बांधलेला आहे. शेजारच्या खेड्यापाड्यांतून निरनिराळ्या