पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७०) १०० फूट चढाव बराच बिकट आहे, म्हणजे काही ठिकाणी केवळ शीर. हातावर घेऊन तुटलेल्या भयंकर कडयांच्या अगदी कांठावरून जावे लागते. हा चढाव जेथे संपतो तेथें पूर्वी पहिला दरवाजा होता. याच्या मागच्या बाजूस खडकाचे आंतून खोदलेला बोगद्याप्रमाणे एक जिना लागतो. ह्या जिन्याच्या माथ्याशी पूर्वी दुसरा दरवाजा होता, व त्याच्यावर काही पाण्याची टाकी व कांही झोपडी होती. येथून पहिल्याहून बिकट व भयंकर असा दुसरा ३०० फुटांचा चढाव लागतो. हा चढून वर गेलें ह्मणजे एक १० १५ फूट रुंदीचा माळ लागतो. येथे खडकांत खोदलेली कांहीं मोठमोठी टांकी व सामान सुमान ठेवण्याकरितां म्हणून कांहीं भुयारे आहेत. या भुयारांवरील खडकाची उंची सुमारे १०० फूट आहे. येथून वर माथ्यावर जाण्याचा रस्ता फारच बिकट आहे. हा रस्ता अरुंद असून अगदी उभा आहे, व तो खडक फोडून तयार केलेला आहे. हा वरचा किल्ला हल्ला करून कधीच घेता येणार नाही. असें डिकिनसन साहेबांचे मत होते. इ० स० १८६२ त याची पडापड झालेली होती. वर पाणी होते, परंतु जवळपास धान्यसामग्री मिळण्याची फारच पंचाईत होती. येथें ज्या गुहा व जी टांकी खोदलेली, आहेत त्यांवरून प्राचीन काळी तेथें जैन लोकांची वस्ती असावी असें अनुमान होते. ३८ नळदुर्गः--हा किल्ला मुरबाडच्या आग्नेयीस सुमारे ९ मैलांवर नारिवली नांवाच्या खेड्यांत मोडतो. तो सह्याद्रीच्या एका फांट्यावर बांधलेला आहे. इ. स. १८६२ त त्याची सर्वत्र पडापड झालेली होती.