पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पेशवे यास तो किल्ला घेण्याकरितां पाठवून दिले. मोरोपंत दोन महिनेपर्यंत या किल्लयास वेढा घालून बसला होता, व तितक्या अवकाशांत त्याचे नुकसानही बरेच झाले. तथापि शेवटी त्याने तो किल्ला सर केला. तेव्हांपासून इ. स. १८१७ त पुणे येथे इंग्लिश व पेशवे यांच्यामध्ये जो तह झाला तोपर्यंत त्याचे स्वामित्व मराठ्यांकडे होते. पुढे तो इंग्लिशांचे हाती गेला. इंग्लिशांचे हाती आल्यापासून हा किल्ला ओसाड स्थितीत आहे. ___३५ बळवंतगड- हा किल्ला शहापूरच्या ईशान्येस थोड्या मैलांवर विहीगांव नांवाच्या खड्यांत मोडतो. ज्या टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे, त्याची उंची १००० फूट आहे. पूर्वी या किल्ल्यावरून तळघांटावर चांगला मारा लागू पडत असावा असे वाटते. किल्लयाचा तट दगड व चुना यांनी बांधलेला असून त्याची उंची ६ पासून १० फुटापर्यंत व रुंदी सुमारे ८ फूट आहे. तटाची एकंदर लांबी सुमारे एक मैल आहे. किल्लयांत एक मोठी इमारत, व दुसरें एक लहानसे घर यांच्या खुणा अद्यापि दृष्टीस पडतात. हल्ली हा किल्ला बहुतेक मोडकळीस आलेला आहे. ठाणे जिल्ह्यांतील बहुतेक किल्लयांप्रमाणे ह्या ठिकाणी मोंगल, मराठे, किंवा इंग्लिश यांचे कारकीर्दीत एखादी विशेष महत्त्वाची गोष्ट घडून आल्याचा दाखला कोठेही उपलब्ध नाही. मुखाड तालुका. ३६ बहिरवगड.:--ह्या किल्ल्याला बैराम' असहा म्ह