पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याच्या दोन्ही बाजूंस दोन व माथ्यावर एक असे बुरूज आहेत, व दरवाज्याच्या भिंती तशाच बाहेरच्या बाजूस तुटलेल्या कड्यापर्यंत वाढवीत नेलेल्या आहेत. दरवाज्याच्या जरा पलीकडे टेंकडीच्या माथ्यावर एका उंचवट्याच्या जागेवर एक बुरूज आहे, त्याला परथळगड असें म्हणतात. हा बुरूज आतशय ठेंगणा असून हल्ली नादुरुस्त आहे. उत्तरेस पळसगड व दक्षिणेस भंडारगड येथे या किल्ल्यावरून जाता येते. फक्त मध्यंतरी लहानशा दरी आहेत. खालच्या सपाट प्रदेशाकडून फक्त पळसगडावर जातां येते. माहुली व भंडारगड या किल्लयांत कांहीं इमारती आहेत, परंतु त्यांची दागदुजी केली पाहिजे. पळसगड, व दुसऱ्या ठिकाणची तटबंदी कोसळत चालल आहे. इ० स० १८६२ त ह्या किल्ल्याची सर्वत्र पडापड झालेली होती व कालांतराने पूर्वी येथे किल्ला होता किंवा नाही याचीच शंका उत्पन्न होईल असे वाटते. इ. स. १४८१ त अहमदनगरच्या निजामशाही घराण्याचा मूळ पुरुष मालिक अहमद याने कोंकणांतले पुष्कळ किल्ले सर केले,त्या वेळी माहुलीचा किल्लाही त्याचे हाती आला. इ. स. १६६१ त शिवाजीने हा किल्ला मोंगलांपासून सर केला. शहाजर्जाचे वेळी शिवाजीची मातुश्री जिजाबाई शिवाजीसह मधून मधून या किल्ल्यावर राहत असे. नंतर शिवाजीने इ. स. १६६५ त जयसिंगाशा जो तह केला त्या अन्वये त्याचे स्वामित्व फिरून मोंगलांकडे गेले. पुढे मोंगलांचा व शिवाजीचा बेबनाव झाल्यावर इ. स. १६७० त शिवाजीने मोरोपंत पिंगळे