पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे, व नमाज पढण्याची जागा आहे. हल्ली ह्या दोन्ही इमारतींची पडापड झालेली आहे. टकमक किंवा मलंगगड या किल्लयांप्रमाणे या किल्ल्याच्याही सभोवार पांचसहाशे फूट खोल एकसारखा तुटलेला कडा आहे. दक्षिणेच्या बाजूस एक मोठी भेग आहे. ही पूर्वी तुरुंगाची जागा होती. एकदा आंत मनुष्य गेलें म्हणजे त्याला मुळीच वर चढतां येत नसे, व यदाकदाचित् वर चढलेच तर वरच्या टोकांवरून खाली उडी टाकणे म्हणजे आपण होऊन मृत्यूला पदरी बांधून घेण्यासारखे होते. इ० स० १८१८ त क्यापटन डिकिनसन याने या किल्ल्याचे असें वर्णन केले आहे की, "हा किल्ला २५०० फुटांहून जास्त उंचीच्या एका टेकडीवर बांधलेला असून तो ठाणे जिल्ह्यांतील सर्व किल्लयांहून उंच आहे. ह्या टेकडीला तीन शिखरे असून त्यांना तटबंदी केलेली आहे. उत्तरेकडील शिखराला पळसगड, मध्यशिखराला माहुली, व दक्षिणेकडील शिखराला भंडारगड असें ह्मणतात. या ताहीत माहुलीचा किल्ला मोठा आहे.हाणजे तो सुमारे अर्धा मैल लांब व जवळ जवळ तितकाच रुंद आहे. या किल्ल्याला पाण्याचा पुरवठा फार चांगला आहे, व आंतील जमीनही फार उत्तम आहे. किल्ल्याची चढण फारच अवघड आहे. माथ्याजवळची चढण एका भयंकर दरीतून आहे. या दरीच्या माथ्याशी एक अतिशय मजबूत दरवाजा आहे.

  • ज्यांना हल्ली नाशीकचे नबाब असें ह्मणतात त्यांचे कुटुंब पूर्वी भिवंडी येथे राहत असे. त्या कुळांतील पुरुषांकडे पूर्वी या किल्ल्याची व्यवस्था होती; व त्या संबंधाची सनद अद्यापि त्यांचेपाशी आहे.