पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्या उत्तरेस पंचवीस तीस मैलांवर, व मोखाड्याच्या नैऋत्येत सुमारे ८ मैलांवर एका सातशे फूट उंचीच्या टेकडीवर बांधलेला आहे. हा कुरलोट नांवाच्या खेड्यांत मोडतो. याची लांबी १५०० फूट व रुंदी ३०० फूट आहे. टेकडीच्या पायथ्यापासून किल्लयांत येण्याचा रस्ता २ मैल लांबीचा आहे. इ० स० १८१८ त ह्या किल्लयाची बहुतेक पडापड झालेली होती. फक्त आनेईच्या कोपयाजवळ तटबंदीचा काही भाग शिल्लक होता. तसेच किल्ल्याचा दरवाजा व त्याच्या दोन्ही बाजूंचे बुरूज शिल्लक होते. परंतु ह्या बुरुजांवर पडभिंत वगैरे काही नव्हते; व माथ्यावर एका उंच ठिकाणी सुमारे १० फूट उंच व ६॥ फूट जाड असा एक लहानसा बुरूज होता. त्रिंबकाहून वाड्यांस जो रस्ता येतो त्याने आले तर हा किल्ला दृष्टीस पडतो. ३४ माहुलीचा किल्ला. हा किल्ला शहापूर तालुक्यांत शहापूरच्या वायव्येस सुमारे ४ मैलांवर माहुली नांवाच्या डोंगरावर बांधलेला आहे. या डोंगराची उंची २८१५ फूट आहे. या डोंगराच्या दक्षिणेकडील टोकास एक सुमारे ८०० फूट खोल अशी भयंकर दरी आहे. किल्यावर जाण्याचा जुना रस्ता पूर्वेच्या बाजूस माची नांवाच्या खेड्यावरून होता. त्याचा दरवाजा एका तुटलेल्या दरीच्या तोंडाशी आहे, व ह्या दरीच्या माथ्यावर दरवाजाच्या रक्षणार्थ ह्मणून जी भिंत घातलेली आहे, ती अद्यापि आतिशय मजबूत आहे. हा किल्ला मोंगलांनी असे सांगतात. त्याच्या माथ्यावर एक मशीद