पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आसपास धान्यसामग्री वगैरे पोटगाचे जिन्नस मिळण्याची फार मारामार होती. या किल्ल्याचे संबंधाने प्रसिद्ध अशी एखादी गोष्ट इतिहासांत मिळत नाही. भिवंडी तालुका. ३२ गूमतरा किल्ला :-हा किल्ला भिवंडी तालुक्यांत टकमक नांवाच्या किल्ल्याच्या दक्षिणेश १५ मैलांवर दुगड नांवाच्या गांवाशेजारी १९४९ फूट उंचीच्या एका टेंकडीवर बांधलेला आहे. ज्या टेकडीवर हा किल्ला बांधलेला आहे, ती स्वतःसिद्धच अतिशय अवघड आहे. ज्या ठिकाणी शत्रु वर चढून येण्याची भीति होती, तेथें तटबंदी घालून नीट बंदोबस्त केलेला होता. परंतु इ० स० १८१८ त ह्या तटबंदीचा पुष्कळ ठिकाणचा भाग कोसळून गेला होता, व पुष्कळ ठिकाणी फक्त दगडांच्या राशी पडलेल्या होत्या. किल्ल्याचा दरवाजा टेकडीच्या माथ्यापासून ४०० फूट उंचीवर एका अरुंद व एक सारख्या तुटत गेलेल्या अशा वहाळांच्या तोंडाशी होता. हल्ली या ठिकाणी मात्र तटबंदीचा कांहीं थोडा अवशेष भाग दृष्टीस पडतो. ह्या दरवाज्याशेजारी खडकात खोदलेली ७ पाण्याची टांकी आहेत. पूर्वी गडकरी लोकांस पाण्याचा पुरवठा या टाक्यांपासून होत असे. शहापूर तालुका. ३३ भोपटगड.:-हा किल्ला शहापूर तालुक्यांत माहुली