पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन्ही बाजूस तट घातलेला असून तो डोंगराच्या सुळक्यापर्यंत बांधलेला होता. हा दरवाजा व वरचा किल्ला यांचे निमे अंतरावर बाहेरच्या कोटाच्या काही खुणा होत्या. पश्चिमेच्या बाजूस वरच्या किल्ल्याचेखाली सुमारे १५० पासून २०० फुटांवर खालच्या सपाट प्रदेशावर उतरण्याकरितां पूर्वी रस्ता होता अशा बद्दलच्या खुणा होत्या. त्या वेळी तो रस्ता उपयोगांतून गेलेला होता. वरच्या किल्ल्यावर जाण्याचा रस्ता फार उभा होता, व तो वरच्या किल्ल्याचे मान्यांत होता. वरच्या किल्ल्याचा माथा ४०० यार्ड लांब व साधारण ४० यार्ड रुंद होता. टेकडीच्या सभोवार बहुतेक तुटलेला कडा असल्यामुळे फक्त दक्षिण व पश्चिम या बाजूस मात्र तटबंदी केलेली होती; व जागेच्या सवघड व अवघड मानाप्रमाणे तटाची उंची १० फुटांपासून २० फुटांपर्यंत होती. तटबंदीच्या एकंदर स्थितीवरून तिची पुष्कळ वर्षांत दुरस्ती केलेली नव्हती असें दिसत होते. बहुतेक ठिकाणचा तटाचा चुना धुवून गेलेला होता, व तटाच्या भिंती जेमतेम जीव धरून उभ्या होत्या. किल्लयांत साधारण महत्त्वाच्या इमारती झटल्या म्हणजे एक धान्याची कोठी, एक खजिन्याची कोठी, व शिबंदीकरितां बांधलेली एक इमारत इतक्या होत्या. किल्लयांतील मंडळीस पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून वरच्या किल्लया. चे पश्चिमस सपाट जागेवर खडकांत नऊ टांकी खोदलेली होती, व दहावे टाके दरवाज्याच्या बाहेरच्या अंगास होते. इ० स० १८६२ त या किल्ल्याची सर्वत्र पडापड झालेली होती. किल्ल्यांत पाण्याचा पुरवठा होता, परंतु