पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करितां जातात. त्यांच्या संबंधाने अशी दंतकथा आहे की, पूर्वी एका तळघराच्या कोनाड्यांत देवीची मूर्ति बसविलेली होती. परंतु तिला महाराचा विटाळ झाला तेव्हां ती तेथेच अदृश्य झाली. या कोन्हाड्याला एक छिद्र आहे व त्यांत जाऊन ती देवी बसली आहे, अशी तिकडील भोळ्या लोकांची समजूत झाली आहे, व त्यांना जो नवस फेडावयाचा असेल तो ते या छिद्राजवळ फेडतात. या किल्ल्याच्य, संबंधाने ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. ३० कामनदुर्ग. हा किल्ला तुंगारच्या डोंगराच्या अगदी दक्षिणेकडच्या टोकावर एका २१६० फूट उंचीच्या टेंकडीवर कामन नांवाच्या खेड्याशेजारी बांधलेला आहे. हल्ली त्या किल्ल्याचा काही थोडा भाग अवशेष राहिलेला आहे. या टेकडीवर ट्रिग्नामेटिकल सर्वेचे ठाणे असते. याच्या संबंधाने इतिहासप्रसिद्ध अशी गोष्ट उपलब्ध नाही. वा. तालुका. ३१ कोजचा किल्ला:-हा किल्ला वाड्यांच्या पश्चिमेस १० मैलांवर एका १९०६ फूट उंचीच्या टेकडीवर बांधलेला आहे. किल्लयावर जाण्याचा रस्ता दोन सुळक्यांच्या मध्ये एक दरी आहे तिच्यांतून आहे. हा किल्ला इ० स० १६९२ त मराठ्यांनी बांधला अशी दंतकथा आहे. इ०स० १८१८ त या किल्ल्याची स्थिति पुढे दिल्याप्रमाणे होतीःवरच्या किल्ल्याच्या दक्षिणेकडच्या बाजूस सुमारे ४०० याडीवर त्याचे मान्यांत असा एक दरवाजा होता. त्याच्या