पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६०) लयाचे वर्णन केलेले आढळतें. तो ह्मणतो की, 'समुद्राच्या बाजूने खडक असल्यामुळे हा किल्ला सर करण्यास फार अवघड आहे. ' जमिनकिडच्या बाजूने किल्ल्याची विशेष मजबुती केलेली नव्हती. इ० स० १६५९ त सुरत येथील इंग्लिशांच्या काउन्सिलांतील मंडळीने हिंदुस्तानांत स्वतःच्या अमलाखालचे असे एक ठाणे पाहिजे अशा उद्देशाने कोर्ट आफ डायरेक्टर्स यांस असे लिहिले की, " काय पाहिजे ते होऊ द्या, परंतु हिंदुस्तानांत पोर्तुगीज लोकांच्या अमलापैकी दंडाराजपुरी, मुंबई किंवा वरसोवा यांपैकी एक ठिकाण पोर्तुगालच्या राजापासून मिळवा." इ० स० १६९४त म. स्कत येथील अरब लोक वरसोवा येथे उतरले, व त्यांनी तेथील लोकांची कत्तल केली. इ०स० १७३९ त मराठ्यांनी तो किल्ला, पोर्तुगीज लोकांपासून जिंकून घेतला. इ० स० १७७४ त कर्नल कीटिंग याने वरसोवा मराट्यांपासून घेतला. इ० स० १८०० पासून १८७४ पर्यत इंग्लिशांचा तेथें तोफखाना होता; व इ० स० १८१८ पर्यंत इंग्लिशांची काही फौजही तेथे राहत असे. २९ जिवधनचा किल्ला---जिवधन नांवाची टेकडी विरार स्टेशनाच्या पूर्वेस एक मैलावर असून तिच्या माथ्यावर पूर्वी एक किल्ला बांधलेला होता. त्याची हल्ली पडापड होऊन गेली आहे. किल्लयांत काही जुनी भुयारे व टांकी आहेत. यांना पांडवकृत्ये असें ह्मणतात. पर्जन्यकाळ शिवाय. करून इतर काळी आसपासच्या खेड्यांतील मंडळी व विशेषतः स्त्रिया या तळघरांत आपले नवस फेडण्या