पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५९) वशी इंग्लिशांनी हल्ला करून किल्ला सर केला, व आंतील बहुतेक शिबंदीस ठार मारिलें. या लढाईत इंग्लिशांच्या आरमाराचा सरदार कमोदर वाटसन हा तोफेचा गोळा लागून मरण पावला. नंतर इंग्लिशांनी किल्लयाच्या सभोंतालची घरे पाडून टाकिली, व बागायत तोडून टाकिलें, व किल्लयाची नीट दुरुस्ती केली. मराठयांचे वेळी किल्ल्यावर एकंदर १०० तोफा असत. गंगाधर शास्त्री पटवर्धन याचा खून करणारा दुसरे बाजीराव पेशव्याचा मंत्री त्रिंबकजी डेंगळे यास इ. स. १८१६ त इंग्लिशांनी ठाण्याचे किल्लयांत कैदेत ठेविलें, व त्याच्यावर युरोपियन लोकांचा पहारा ठेविला. परंतु वाजीरावाच्या मदतीने त्याने इंग्लिशांच्या हातावर तुरी दिल्या व तेथून तो पळून गेला इ० स० १८३३ पर्यंत या किल्लयांत इंग्लिशांचे फौजेचे ठाणे होते. पुढे त्यांनी तो किल्ला पाडून टाकिला, व ती जागा तुरुंगाकरितां तयार केली. २८ वरसोवा: हा किल्ला वरसोवा खेडे व माढ बेट यांच्यामध्ये खाडीच्या मुखाशी आहे. तो साधारण उंचवट्यावर बांधलेला आहे. हा किल्ला बहुधा पोर्तुगीज लोकांनी बांधला असावा, व मराठ्यांनी त्याची दुरस्ती केली असावी असें अनुमान होते. इ. स. १६९५ त गेमेली क्यारेरी याने या किल्लयाचे वर्णन केलेले आहे. इ. स. १७२८ त याच्या संबंधाने असा लेख सांपडतो की, हा किल्ला जुना असून मोडकळीस आलेला आहे. आंत ५० शिबंदी आहे, व दहा तोफा आहेत. त्यांपैकी फक्त २ उपयोगाच्या आहेत. इ० स० १७८७ त डाक्तर डोव्ह साहेब यानेही या कि