पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५८) ठाण्याच्या किल्लयावर हल्ला केला. परंतु मल्हारराव होळकराने त्यास मागे हटविले. इतक्यांत क्रॉयस साहेब गोळी लागून पडला व पोर्तुगीज सैन्य पळून गेले. पुढच्या वर्षी (इ. स. १७३९) चिमणाजी आप्पाने वसई घेतली, त्यामुळे पोर्तुगीज लोकांची उत्तर-कोकणांतील सत्ता नाहीशी झाली. तेव्हां वसई व ठाणे येथील श्रीमान पोर्तुगीज लोक आपले मोठमोठाले वाडे सोडून देऊन गोवें व मुंबई येथे जाऊन राहिले. मराठ्यांनी पोर्तुगीज बाटे लोकांस मुळीच उपद्रव दिला नाही, व ते मराठ्यांचे अमलाखाली बिनधास्त रीतीने राहत अलत असें डफ साहेब लिहितात. इ. स. १७७१ त ठाणे व वसई मराठ्यांपासून परत घेण्याकरितां पोर्तुगीज लोकांचे आरमार येत आहे अशी बातमी इंग्लिशांस कळतांच त्यांनी आपणास ठाणे द्यावे असे बोलणे लावण्याकरितां पेशव्यांचे दरबारी आपला वकील पाठविला. पेशव्यांनी ती गोष्ट कबूल केली नाही. तेव्हां जोरानें तो किल्ला घेण्याचा इंग्लिशांनी निश्चय केला. ता. १२ दिजंबर १७७४ रोजी जनरल राबर्ट गारडन साहेब बरोबर ६०० इंग्लिश लोक व १२०० काळे लोक घेऊन मुंबईहून निघाला व ठाण्यास आला. त्याने तारीख २० रोजी किल्ल्यावर आपला तोफखाना सुरू केला व ता० २४ रोजी किल्लयाच्या तटास खिंडार पाडिलें. ता० २७ रोजी इंग्लिशांनी किल्लयासोंवतालचा खंदक भरून काढण्याचा प्रयत्न चालविला. परंतु मराठयांनी त्याप्त मागे हटविलें. त्या वेळी १०० युरोपियन लोक ठार झाले. दुसऱ्या दि