पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५७) होती. इ० स० १८८१ त या किल्ल्याचा मागमूसही शिल्लक राहिला नव्हता. त्याचे दगड काढून त्यांचा उपयोग बहुधा आगगाडीचा रस्ता बांधण्याकडे केला असावा असें क्यांबेल साहेब लिहितात. ठाणे स्टेशन सोडून पुढे गेलें म्हणजे जे दोन बोगदे लागतात ते परसीक डोंगरांतले आहेत. त्यांपैकी एक १०३ यार्ड लांब, व दुसरा ११५ यार्ड लांब आहे... २७ ठाण्याचा किल्ला. हा किल्ला बांधण्यास पोतुगीज लोकांनी इ० स० १७३० त सुरवात केली, व त्याचे काम अपुरे होते तरी इ० स० १७३७ त मराठ्यांनी या किल्ल्यावर हल्ला केला तेव्हां पोर्तुगीज लोकांनी बरेच दिवस त्यांस दाद दिली नाही. परंतु पुढे तो मराठ्यांचे हातांत गेला व त्यांनी त्याच्या तटबंदीचे काम पुरे केले. त्याचा तट १६ फुटांपासून २१ फुटांपर्यंत उंच होता व त्याला मधून मधून पुष्कळ बुरूज व मेढेकोट होते. किल्ल्यांत एकंदर १३॥ एकर जागा होती. इ० स० १७३८ त पेड्रो डी लो नांवाचा पोर्तुगीज सरदार बरोबर ५००० युरोपीयन व ४००० बाटे लोक घेऊन ठाण्याचा किल्ला घेण्याकरितां आला. त्याने प्रथमतः अशिरीच्या किल्ल्यावर हल्ला करून मराठयांचे मेढेकोट पाडून टाकिले, व तो ठाण्याच्या किल्लयावर चाल करून आला. परंतु मुंबईच्या इंग्लिशांच्या गव्हरनराने ह्या गोष्टीची बातमी मराठ्यांस अगोदरच दिली होती. तेव्हां पहिले बाजीराव पेशव्याने मल्हारराव होळकरास सैन्यासह ठाण्यात पाठवून दिले. पोर्तुगीज सरदार डान आन्टोनिओ फ्रॉयस याने