पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५६) २५धारावी किल्ला-- हा किल्ला वसईच्या खाडीच्या मुखाशी धारावी नांवाच्या बेटांतील एका टेकडीवर बांधले. ला होता. हल्ली या किल्लयाची पडापड झालेली आहे. पोर्तुगीज लोकांचे वेळी किल्लयांत एक चर्च होतें. इ० स० १७३९ त चिमणाजी आप्पाने पोर्तुगीज लोकांपासून हा किल्ला घेतला. इ० स० १८१८ त त्याचे स्वामित्व इंग्लिशांकडे गेलें. धारावी येथे उत्तम दगडाच्या खाणी • आहेत. वसई प्रांतांतील बहुतेक किल्ले याच दगडाचे बांधलेले आहेत, व पोर्तुगीजांचे वेळी ते वसईहून गोव्यांस घरे बांधण्याकरितां जो दगड नेत असत तो याच खाणीपैकी होता. धारावी येथील डोंगरांत उत्तम पाण्याचे पुष्कळ झरे आहेत. २६ परसिकचा किल्ला.--हा एक लहानसा किल्ला कल्लयाणच्या खाडीच्या मुखाशी आहे. हल्ली याची पडापड झालेली आहे. हा किल्ला पाण्यापासून सुमारे २५ फूट उंचीच्या चोहोकडून सारख्या तुटलेल्या एका खडकावर बांधलेला आहे. किल्लयांत जाण्याचा दरवाजा खाडीच्या बाजूस असून वर चढण्यास खडक फोड़न पायऱ्या तयार केलेल्या आहेत. या किल्ल्याची तटबंदी फार जुनी आहे असे म्हणतात. इ. स. १८१८ त या किल्ल्याची तटबंदी सर्व बाजूंनी पडू लागली होती. तटाची उंची १२ पासून २० फुटांपर्यंत होती, व नदीच्या अंगास मेढेकोट बांधलेला असून तेथे सहा तोफा ठेवितां येतील अशी व्यवस्था केलेली होती. बाकीच्या बाजूंनी तटाला बंदुका मारण्याकरितां फक्त भोंकें ठेविलेली