पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डॉम जोआम याच्या कारकीर्दीत हिलारियलच्या मार्किसाचा पुत्र आलफन्सो डी नारोन्हा हा सुभेदार असतां व मानसिस्को डीसा हा वसईच्या किल्ल्याचा कप्तान असतां • हा साम सेबास्टियन नांवाचा बुरूज तारीख २२ फेब्रुवारी इ० स०१९५४ रोजी बांधला." इ०स० १७३९त मराठे लोक ज्या बुरुजांतून किल्लयांत घुसले तो हाच बुरूज. हल्लीं वसईच्या किल्ल्यांतून समुद्राच्या बाजूस असलेल्या दरवाज्याकडे जाण्याकरितां नवीन रस्ता केलेला आहे. या रस्त्याला समांतर असा जुना रस्ता अद्यापि किल्लयांत कायम आहे. या रस्त्याने निघाले म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंस पुष्कळ नाश पावलेल्या जुन्या इमारती दृष्टीस पडतात. हल्ली त्या इमारतींच्या पङक्या भिंतींवरून वेली व दुसरी झाडेझुडपे वाढलेली आहेत. मराठ्यांचे हाती हा किल्ला आल्यावर त्याचे वैभव कमी झाले. परंतु वर दिलेल्या वर्णनावरून हा किल्ला पोर्तुगीज अमलाखाली असता त्याचे वैभव काय असेल त्याची कल्पना सहज होण्यासारखी आहे. जासासाष्टी तालुका. २४ बेलापूरचा किल्लाः-हा किल्ला पनवेलच्या पश्चिमेस ५मैलांवर पनवेलच्या खाडीच्या मुखाशी बेलापूर नांवाच्या एक मैल लांब व एक मैल रुंद अशा बेटावर बांधलेला आहे. क्यापटन डिकिनसन याने इ०स० १८१८त याचे असें वर्णन केले आहे की, या किल्ल्याची उत्तरदक्षिण लांबी ४०० फूट व पूर्वपश्चिम रुंदी सुमारे २०० फूट आहे. उत्तरेच्या बाजूस