पान:महाराष्ट्रातील किल्ले (भाग २).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५३) थडग्यांवर लेख लिहिलेले आहेत. पूर्वी फ्रान्सिसकन पंथांतील लोकांना राजाश्रय होता, परंतु इ० स० १६३४ त त्या लोकांचे प्राबल्य अगदी कमी होऊन जेसूईट लोकांचे प्रस्थ बरेंच माजले होते. तथापि अशा वेळीही वसई येथे ३० फ्रान्सिसकन्स, १५ जेसूईट्स, १० डोमीनिफन्स व ८ आगस्टिन्स असे निरनिराळ्या पंथांचे लोक होते. । फ्रान्सिसकन पंथाच्या लोकांचे देवालय किंवा मठ आणि जेसूईट पंथाच्या लोकांची देवालये यांच्या मध्यंतरी डॉ. मिनिकन पंथाच्या लोकांचे देवालय आहे, व सान गों. कालो नांवाचा त्यांचा मठ आहे. ह्या दोन्ही इमारतींची हल्ली पडापड झालेली आहे. देवालयाच्या कांही भिंती, व त्याचा मनोरा एवढाच कायतो भाग हल्ली उभा आहे. तसेच त्या देवालयांतील मुख्य भजनाची जागाही अ. द्यापि बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे. वर सांगितलेल्या मठाची स्थापना इ० स० १५८३ त झाली. या मठाचा हल्ली पूर्ण नाश झालेला आहे. फ्रान्सिसकन व डॉमिनिकन लोकांच्या नाश पावलेल्या इमारती व किल्लयाचा तट यांच्यामध्ये एक रस्ता आहे. या रस्त्याने गेलें म्हणजे साम सेबास्टियन नावाचा एक बुरूज लागतो. या बुरुजाला पूर्वी एक चोरदरवाजा होता, तो हल्ली बुजवून टाकलेला आहे. या बुरुजाच्या मुख्य दरवाज्यापाशी एक शिला पडलेली आहे, तिच्यावर खाली दिलेला लेख लिहिलेला आहे: “पोर्तुगाल देशाचा अति उच्च व बलाढय राजा तिसरा